मतदारांचा विकास व प्रगतीचे स्वप्न साकार करण्यासाठी सदैव कार्यरत – आ. सावरकर ; व्यावसायिक समाजातर्फे भावपूर्ण सत्कार

0

अकोला दिव्य ऑनलाईन : निवडणुकीत जिंकणे जरुरी असले तरी प्रत्येक व्यक्तीचा आणि मतदार संघाचा विकासाचे मी स्वप्नात पाहतो आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी मी मागील १० वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करीत आहे, असे सांगून आ.सावरकर यांनी आपल्या क्षेत्राच्या विकासासाठी नियोजित कार्ये आणि भविष्यातील योजनांवर प्रकाश टाकला.या सत्कारासाठी मी नेहमी सर्वांचा ऋणी राहीन या शब्दात त्यांनी आभार मानले.

अकोला पूर्व मतदारसंघातून तिसऱ्यांदा ऐतिहासिक विजय पदरात पाडून घेत, या मतदारसंघांतून सलग तीन वेळा विजयी होण्याचा बहुमान प्राप्त करणारे आमदार रणधीर सावरकर यांचा जनसंपर्क कार्यालयात जाऊन हिंदुत्ववादी समाज, व्यावसायिक समुदाय आणि सर्वांनी उपस्थित अभिनंदन केले. आ. सावरकर यांचा ऐतिहासिक विजय हा त्यांच्या अद्वितीय कार्यक्षमता, विकासाची दूरदृष्टी आणि अतुट जनसेवेच्या भावनेचे प्रमाण आहे.अशा शब्दात उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त करीत पुष्पहार घालून व आतिषबाजी करून सत्कार केला.

यावेळी निकेश गुप्ता, ब्रिजमोहन चितलांगे, संतोष छाजेड, सिद्धार्थ रुहाटिया, अजय सेंगर , अमरीश पारेख, शितलकुमार जैन, दिलीप बाफना, जयप्रकाश चांडक, कृष्णमुरारी काबरा, निलेश ठाकुर सिंह अग्रवाल सहित अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी आ.सावरकर यांचं अभिनंदन केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरण पार पडला,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here