अकोला पश्चिममध्ये हरिश आलीमचंदानी यांच्या कार्याची दखल ! मातंग समाजाचा लिखित पाठींबा

0

अकोला दिव्य ऑनलाईन : आपले मत योग्य उमेदवाराला गेले पाहिजे, या विचाराने अकोला पश्चिम मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत उमेदवार हरिश आलीमचंदानी यांनी अकोला नगर पालिकेचे नगराध्यक्ष असताना केलेल्या कार्यांची मतदारांनी दखल घेत असून आता मातंग समाजाने हरिशभाई यांना लिखित स्वरूपात जाहीर पाठींबा दिला आहे. या पाठींब्याने वंचितच्या कार्यकर्त्यांसह स्थानिकांच्या सहभागाने प्रचार यात्रेत दुप्पट उत्साह संचारला आहे.

वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक मैदानात असलेले स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार म्हणून हरिष आलीमचंदानी यांची निवडणूक मतदारांनी आपल्या हाती घेतली. त्यांचे निवडणूक चिन्ह तसेच ई.व्ही. एम. मशीन वरील अनुक्रमांक १३ हा घराघरात पोहचवला जात आहे. मतदारांनी दिलेल्या प्रतिक्रिये नंतर आता फक्त निवडणूक निकालाची प्रतीक्षा असून, कोणत्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला टक्कर देऊन किती मताधिक्य घेणार, अशी चर्चा सुरु झाली आहे. मातंग समाजाने आलिमचंदानी यांना पाठिंबा देताना वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, पुरुष आणि महिला मतदार मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here