अकोला दिव्य ऑनलाईन : महाराष्ट्रात विधानसभेची सार्वत्रिक निवडणूकीसाठी येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून, अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मतदारांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. गेली 30 वर्षे अकोला पश्चिमवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकत असताना अकोल्याचे लालाजी म्हणजेच माजी आमदार गोवर्धन शर्मा यांचे निधन झाले. त्यानंतर पक्षश्रेष्ठींनी लालाजींचे शिष्य आणि अकोला महानगरपालिका महापौर पदाचा अनुभव असलेले विजय अग्रवाल यांना अधिकृत उमेदवार म्हणून जाहिर केले.
विजय अग्रवाल यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान
अकोला पश्चिमेचे भाजपाचे उमेदवार विजय अग्रवाल यांच्या प्रचारासाठी मतदारसंघात 9 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा घेतली. यावेळी महायुतीचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी हजारोंच्या संख्येने हजेरी लावली होती. या सभेची चर्चा सुरुच होती तोवर 13 नोव्हेंबरला उत्तर प्रद्रेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची देखील सभा झाली. या दोन्ही सभांचा अकोला पुर्व व पश्चिममधून भाजपा उमेदवारांना फायदा होणारच आहे.
माजी महापौर विजय अग्रवाल यांची अकोला पश्चिममध्ये लोकप्रियता असल्याचे देखील निदर्शनास येत आहे. नागरिकांमध्ये लालाजींचे शिष्य आणि विकासाची दूरदृष्टी ठेवणारा नेता म्हणून असलेली त्यांची छबी अधिकाधिक उजळत चालली आहे. येत्या 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक निकालाच्या माध्यमातून नागरिकांनी दिलेला कौल समजेल. परंतु विजय अग्रवाल यांची अकोला पश्चिममध्ये असलेली लोकप्रियता आणि प्रचाराचा झपाटा पाहता अकोला पश्चिममधून विजय अग्रवाल यांना नागरिकांचा प्रतिसाद वाढत चालला असल्याची चर्चा आहे.