अकोला दिव्य ऑनलाईन : वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अँड प्रकाश आंबेडकर यांनी अकोला पश्चिम मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे समर्थित उमेदवार म्हणून हरिश आलिमचंदानी यांची उमेदवारी पुरस्कृत केल्यानंतर मतदारांच्यासोबतीने सुरु झालेल्या झंझावाती प्रचाराने येथील निवडणूकाला वेगळाच नूर आला आहे. आता निवडणूक काट्यावर काटा येतो, त्याप्रमाणे झाली असल्याचा सूर लावला जात आहे.
वानखडे नगर पासून सुरु झालेल्या प्रचार दरम्यान बघता बघता मतदारांच्या उपस्थितीने हजारोचा आंकडा कधी गाठला हे कळलेच नाही. केवळ अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघच नाही तर संपूर्ण शहर आणि जिल्ह्यात ख्यातनाम समाजसेवक हरिश आलीमचंदानी प्रचारासाठी वानखडे नगरमध्ये पोहचताच लोकांना गोवर्धन शर्मा उर्फ लालाजींची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही. असे अनेक लोकांनी सांगितले.
थॅलसीमिया या रोगापासून सर्वसामान्य जनतेला मुक्ती देण्यासाठी हरिशभाई गेल्या अनेक वर्षापासून मोफत रोगनिदान शिबीर घेऊन गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध करून देतात. यासाठी रक्तदात्यांची टीम तयार करून वेळोवेळी रक्तदान शिबीरे घेऊन, हा उपक्रम अखंडपणे सुरु असल्याने आतापर्यंत शेकडो लोकांना जीवनदान दिले आहे. अकोला नगर पालिकेत नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. सर्वसामान्य जनतेच्या गरजा जवळून पाहिलेल्या आहेत आणि त्या पूर्णपणे सोडविण्यासाठी आजगत जीवन खर्ची घातले आहे. त्यामुळे आजपर्यंत अकोला महानगर पालिका नगरसेवक पदावर अविरत कार्यरत आहेत.
रोगनिदान शिबीर आयोजित करुन गरजवंतांना अखंडितपणे मदत केली आहे.अनेकांचे संसार उभे करून त्यांचे आशीर्वाद घेतले आहे. त्यामुळेच लोकांनीच त्यांना विधानसभा निवडणूकीत उभे केले आहे. अशावेळी अँड.बाळासाहेब उपाख्य प्रकाश आंबेडकर यांनी आपला पाठींबा देऊन त्यांना वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार केल्याने अत्यंत तुल्यबळ लढत होणार असल्याचा मतदारसंघात सूर एकवटला आहे.
आज मतदारसंघातील डाबकी रोड, वानखडे नगर आणि खदान भागात लोकांच्या भेटीगाठी घेत असताना लोकांनी मोठया संख्येने गर्दी करीत ठीक ठिकाणी पुष्पमाला अर्पण करुन आलिमचंदानी यांच उस्फुर्त स्वागत केले. मागील दोन दिवसांपासून आलिमचंदानी यांच्या प्रचाराच्या झंझावाताने मतदारसंघात मोठी चुरस निर्माण होत असल्याचे चित्र दिसत आहे