‘प्रभात’चा युवराज व पियुषा रायफल शुटींगमध्ये राज्यस्तरावर

0
‘प्रभात’चा युवराज व पियुषा रायफल शुटींगमध्ये राज्यस्तरावर

अकोला दिव्य ऑनलाईन : प्रभात किड्स स्कूलच्या दोन खेळाडूंनी अमरावती विभागीय रायफल शुटींग क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट यश प्राप्त केल्याने त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा संकुल व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय रायफल शुटींग क्रीडा स्पर्धेचे आयोजन हनुमान व्यायाम प्रसारक, अमरावती येथे करण्यात आले होते.

या स्पर्धेत 14 वर्षाआतील मुलांमध्ये ओपन साईट गटात प्रभातचा युवराज मुरुमकार याने तिसरा तर मुलींमध्ये पियुषा मानेवाघ हिने तिसरा क्रमांक मिळविला. विजयी खेळाडूंना ज्येष्ठ रायफल शुटींग मार्गदर्शक विन्सेंट अमेर, प्रभातच्या क्रीडा प्रशिक्षक कोमल यादव यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे, संचालिका वंदना नारे, सचिन निरज आवंडेकर प्राचार्य वृषाली वाघमारे, उपप्राचार्य अर्चना बेलसरे, समन्वयक मो. आसिफ, क्रीडा विभाग प्रमुख संतोष लोमटे यांच्यासह शिक्षकवृंद तथा कर्मचार्‍यांनी विजयी खेळाडूंचं कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here