अकोला दिव्य ऑनलाईन : डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुल सचिव प्रा डॉ वंदन मोहोड यांच्या मातोश्री तथा प्रख्यात विचारवंत व साहित्यिक डॉ बाबासाहेब मोहोड माधान यांच्या धर्म पत्नी श्रीमती विमला बाई मोहोड यांचे आज मंगळवार दि. 12 नोव्हेंबर रोजी अमरावती येथे निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 94 वर्षाचे होते. विमला बाईंचे निधन झाल्या नंतर त्यांचा मृत देह नागपूर येथे त्यांचे पुत्र डॉ नंदन मोहोड यांचे निवास स्थानी नेण्यात आला. तेथे सर्व सोपस्कार आटोपल्या नंतर स्व. विमला बाईंचा देह एम्स हॉस्पिटल नागपूर येथे दान करण्यात आला.
मृत्यू नंतर आपला देह समाजाच्या उपयोगी पडावे या उदात्त व देह दानाची चळवळ जिवंत राहावी या हेतूने आईचा देह दान करीत असल्याची माहिती डॉ वंदन मोहोड यांनी दिली.
नागपूर येथील सेवादल कॉलेजचे प्राध्यापक डॉ सुशील मेश्राम व देहदान चळवळीचे प्रणेते सामाजिक कार्यकर्ते डॉ चंद्रकांत मेहर यांचे या कामी विशेष सहकार्य लाभले.