Wednesday, November 20, 2024
Homeसांस्कृतिकअकोल्यात ‘यहाँ के हम सिकंदर’ ! दिव्यांग मुलांसाठी महोत्सव 20 रोजी

अकोल्यात ‘यहाँ के हम सिकंदर’ ! दिव्यांग मुलांसाठी महोत्सव 20 रोजी

अकोला दिव्य ऑनलाईन : बाल कलावंतांच्या उत्कर्षासाठी कार्यरत व बालकांच्या सांस्कृतिक, शैक्षणिक गरजा आणि हक्क यासाठी चळवळ उभी करणार्‍या महाराष्ट्रातील अग्रणी संस्था बालरंगभूमी परिषदेच्या अकोला शाखेच्या वतीने दिव्यांग मुलांना सांस्कृतिक मंच उपलब्ध करुन देण्यासाठी या मुलांकरिता सांस्कृतिक कला महोत्सव ‘यहाँ के हम सिकंदर’ हा विशेष कला महोत्सव रविवार 20 ऑक्टोबर 2024 रोजी श्री शिवाजी महाविद्यालय, अकोला येथे आयोजित करण्यात आला आहे.

अकोला येथील श्री शिवाजी महाविद्यालय येथे सकाळी 11 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत या महोत्सवाचे उद्घाटन होणार असून जिल्ह्यातील गायत्री बालिकाश्रम, स्व. कन्नुभाई वोरा अंध विद्यालय, उर्त्कष शिशुगृह, सुर्योदय बालगृह, कर्णबधीर मुलींची शाळा, शासकीय मुकबधीर विद्यालय आणि एकविरा मल्टीपर्पज फाऊंडेशन व्दारा संचालित बाल विकास विशेष शाळा यातील विशेष मुलं आपल्या कला सादर करणार आहेत.


या अभिनव उपक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी अकोलेकर रसिकांनी आवर्जून उपस्थिती दर्शवावी अशी विनंती बालरंगभूमी परिषद, अकोला शाखा समितीने केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!