Thursday, January 2, 2025
Homeगुन्हेगारीकरप्शन कारवाईत अडकलेले अकोल्याचे D.D.R डॉ.प्रवीण लोखंडेंची अकार्यकारी पदावर तातडीने बदली...

करप्शन कारवाईत अडकलेले अकोल्याचे D.D.R डॉ.प्रवीण लोखंडेंची अकार्यकारी पदावर तातडीने बदली करा

अकोला दिव्य ऑनलाईन : अकोला जनता बॅकेच्या नुकत्याच पार पडलेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सक्रिय सहभाग घेतलेले आणि दोन वेळा लाच घेताना करप्शन कारवाईत सापडलेले अकोला जिल्हा सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक डॉ.प्रवीण लोखंडे यांची अन्य ठिकाणी अकार्यकारी पदावर बदली करण्यात यावी, असे 5 मार्च 2024 रोजी निबंधक सहकारी संस्था (प्रशासन) महाराष्ट्र राज्य पुणे, यांनी दिलेल्या पत्राची त्वरित दखल घेवून अंमलबजावणी करण्यात यावी. अशी मागणी अकोल्यातील सामाजिक कार्यकर्ते ओमप्रकाश मंत्री यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अकोला येथे कार्यरत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने डॉ.प्रविण लोखंडे विरुद्ध केलेल्या कारवाईच्या अनुषंगाने 29 जुलै 2020 रोजीच्या शासन आदेश अन्वये लोखंडेंना शासन सेवेतून निलंबित करण्यात आले होते. तसेच २२ डिसेंबर २०२१ आणि दि.२० जानेवारी २०२२ रोजीच्या ज्ञापनानुसार डॉ.प्रवीण लोखंडे यांच्या विरुद्ध विभागीय चौकशी आदेशीत केली आहे. विभागीय चौकशीचे कामकाज सध्यस्थितीत चौकशी अधिकारी यांच्या स्तरावर सुरु असून डॉ.लोखंडे बदलीस पात्र नसताना आणि ज्या ठिकाणी व पदावर निलंबित झाले. त्याच पदावर परत त्यांची त्याच ठिकाणी म्हणजे अकोला येथे ४ मार्च २०२४ रोजीच्या शासननिर्णया‌ने अकोला येथे करण्यात आलेली आहे.

अमरावती विभागात कार्यरत असताना डॉ.लोखंडे यांच्या विरुद्ध दोन वेळा अॅन्टी करप्शन ब्युरोने कारवाई केलेली असताना व सघ्यस्थितीत विभागीय चौकशी सुरु असल्याने त्यांना पूर्ववत त्याच पदावर न देता अन्यत्र अकार्यकारी पदावर बदली करण्यात यावी याबाबतचे पत्र पुणे येथील अपर निबंधक सहकारी संस्था (प्रशासन) यांनी दि.५ मार्च २०२४ रोजी सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग मंत्रालयाचे सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव यांना दिलेले आहे.

सघ्यस्थितीत डॉ. लोखंडे अकोला जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था या पदावर कार्यरत असल्याने चौकशीमध्ये बाधा निर्माण होऊ शकते. तेव्हा अपर निबंधक सहकारी संस्था (प्रशासन) पुणे यांनी दिलेल्या पत्राची गंभीरतेने दखल घेऊन डॉ.लोखंडे यांची अन्यत्र अकार्यकारी पदावर तातडीने बदली करण्यात यावी. अशी मागणी अकोला येथील सामाजिक कार्यकर्ते ओमप्रकाश मंत्री यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!