Thursday, December 26, 2024
Homeराजकारणनगरसेवक ॲड. गिरीश गोखले यांचा पुढाकार ! शहर विकासासाठी १० कोटींचा निधी...

नगरसेवक ॲड. गिरीश गोखले यांचा पुढाकार ! शहर विकासासाठी १० कोटींचा निधी ; पी.एच मार्केटमधील रस्त्याचे भूमिपूजन

अकोला दिव्य ऑनलाईन : शहरातील नागरिक, व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी नगरसेवक ॲड. गिरीश गोखले यांनी पुढाकार घेतला. त्यासाठी त्यांनी शासन स्तरावर प्रयत्न करून तब्बल १० कोटी रुपयांचा निधी खेचून आणला आहे. या निधीतून अकोला शहराच्या विविध प्रभागातील नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. ॲड. गिरीश गोखले यांचे कार्य अभिनंदनीय आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी गृहमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले.
अकोला महापालिकेच्या प्रभाग ११ मधील पी.एच. मार्केट परिसरातील रस्त्याचे भूमिपूजन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक हरिभाऊ काळे होते. भारतीय जनता पार्टीचे माजी महानगर अध्यक्ष तसेच प्रदेश कार्यकारिणी आमंत्रित सदस्य डॉ. अशोक कोळंबे, नगरसेवक आशिष पवित्रकार यांची विशेष उपस्थिती होती.
नगरसेवक ॲड. गिरीश गोखले यांनी अथक प्रयत्न करून महाराष्ट्र शासन विशेष निधी तरतुदींतर्गत अकोला महानगरपालिकेकरिता दहा कोटीचा निधी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडून मंजूर करवून आणला. त्या विकासनिधीतून या रस्त्याचे काम होत आहे.
या विकासनिधीतून शहरातील विविध प्रभागातील समस्या दूर करण्यासाठी आपण प्रयत्नरत राहू, असे यावेळी बोलताना ॲड. गिरीश गोखले यांनी सांगितले.

भाजपाचे दिवंगत ज्येष्ठ नेते, मार्गदर्शक आणि आमदार गोवर्धन शर्मा यांनी प्रभाग ११, पीएच मार्केटमधील व्यापारी, उद्योजकांना येणाऱ्या समस्यांबाबत आपल्याला सांगितले होते. लालाजींना दिलेल्या शब्दाची आज पूर्तता होत असल्याचे समाधान मिळाले, असे ॲड. गिरीश गोखले म्हणाले. परिसरातील व्यापारी, उद्योजक, नागरिकांनी प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी ॲड. गिरीश गोखले यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांचे आभार मानले.
यावेळी उद्योजक हरीशभाई मनवाणी, अनिल परयानी, मनुशेठ मोटवानी, सुधीर बेलानी, नरेंद्र भाटिया, मनोज काचलानी, सुरेश लकवाणी, रमेश लकवाणी, दिनेश बजाज, उद्योजक रशीदभाई खान, भागचंद भाटिया, दयालदास फुलवाडी, दिलीप मनवाणी, संजय तिकांडे, दीपक गवारे,आशिष शर्मा, नवल बनिया यांच्यासह परिसरातील शेकडो व्यापारी व रहिवाशांची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!