Sunday, September 8, 2024
Homeताज्या बातम्याउद्या अकोल्यात 2 केंद्रांवर मतदान ! 14 जण रिंगणात ; यंत्रणा सज्ज

उद्या अकोल्यात 2 केंद्रांवर मतदान ! 14 जण रिंगणात ; यंत्रणा सज्ज

अकोला दिव्य ऑनलाईन : मल्टीस्टेट शेड्युल बॅकेचा दर्जा प्राप्त अकोला जनता बँकेच्या 2024- 2029 या 5 वर्षांसाठी संचालक मंडळ निवडण्यासाठी सर्वसाधारण मतदारसंघांतील तब्बल 13 उमेदवारांची निवड करण्यासाठी उद्या बुधवार 24 जुलैला होणा-या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. अकोला जनता बॅंकेचे जवळपास 68 हजार 682 भागधारक असून, निवडणूक रिंगणात 14 उमेदवार असल्याने जाहीर करण्यात आलेल्या निवडणुक कार्यक्रमानुसार उद्या बुधवार 24 जुलैला मतदान होत आहे. निवडणूक विभागाने याकरिता बॅकेच्या शाखा असलेल्या गाव/ शहरात 65 मतदान केंद्र सज्ज केले आहेत. अकोला शहरातील न्यु राधाकिसन प्लॉट मधिल अग्रसेन भवन येथे बुथ क्रमांक 1 ते 11 येथे मतदार क्रमांक 1 ते 16 हजार 580 आणि भाटिया वाडी येथील बुथ क्रमांक 12 ते 16 वर मतदार क्रमांक 16 हजार 581 ते 22 हजार 885 या क्रमांकाच्या मतदारांना मतदान करता येणार आहे.

अकोला शहरासोबतच अकोला जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा, मुर्तिजापुर तसेच वाशिम जिल्ह्यातील वाशिम शहर, मालेगाव शिरपूर जैन, रिसोड, मंगरुळपीर, मानोरा, शेलू बाजार आणि कारंजा तर यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ शहर, दिग्रस तसेच अमरावती शहर, चांदूर रेल्वे आणि परतवाडा तर नागपूर शहर आणि बुलडाणा जिल्ह्यातील खामगांव, मलकापूर, लोणार यासोबतच छत्रपती संभाजी नगर, नांदेड, परभणी, नाशिक, मुंबई, इंदौर, बुराहणपुर आदीसह एकुण 32 ठिकाणी मतदानाची प्रक्रिया राबविली जाणार आहे.

सर्वाधिक मतदार अकोला शहरातील असून, यासाठी 16 बुथ तयार केले आहेत.नियमानुसार प्रत्येक मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावणे आवश्यक असून, निवडणूक विभाग यावर लक्ष ठेवून आहे. भागधारकांकडे जर त्यांचे मतदान क्रमांक नसेल तर मतदान केंद्रावर असलेल्या निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे मतदार यादी राहणार आहे. या यादीतून मतदार क्रमांक मिळवून घेता येईल. मतदान करताना ओळख पत्र अनिवार्य आहे.ओळखपत्राशिवाय मतदान करता येणार नाही.असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिले आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!