good-news for commuters-additional-coaches of general in 14 long distance trains अकोला दिव्य ऑनलाइन : सामान्य जनतेची निकड लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने एक्स्प्रेस गाड्यांमध्ये जनरल डबे वाढविण्याचा निर्णय घेतला असून, नोव्हेंबर महिन्यापासून अकोला मार्गे धावणाऱ्या १४ एक्स्प्रेस गाड्यांमध्ये अतिरिक्त जनरल कोचची सुविधा देण्यात येणार आहे. त्यामुळे जनरल डब्यांमध्ये होणारी गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.
बहुतांश गाड्यांमध्ये केवळ दोनच जनरल डबे आहेत. त्यामुळे जनरल डब्यांमध्ये प्रवाशांची तुंबळ गर्दी होते. पाय ठेवायलाही जागा नसलेल्या डब्यात प्रवाशांना नाईलाजाने प्रवास करावा लागतो. सर्वसामान्य प्रवाशांची ही अडचण लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने एक्स्प्रेस गाड्यांमध्ये जनरल डबे वाढविण्याचे नियोजन केले आहे. यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुरळीत आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव घेता येईल.
कोणत्या एक्स्प्रेसला कधीपासून किती अतिरिक्त जनरल कोच?
रेल्वेचे नाव – अतिरिक्त डबे – कधीपासून जोडणार
मुंबई-गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस – २ – १६ व १७ नोव्हेंबर
एलटीटी-बल्लारशाह-एलटीटी एक्स्प्रेस – १ – १२ व १३ नोव्हेंबर
एलटीटी-शालीमार-एलटीटी एक्स्प्रेस – २ – १५ व १७ नोव्हेंबर
एलटीटी-हावडा-एलटीटी एक्स्प्रेस – २ – १४ व १६ नोव्हेंबर
एलटीटी-पुरी-एलटीटी एक्स्प्रेस – २ – १७ व १९ नोव्हेंबर
मुंबई-अमरावती-मुंबई एक्स्प्रेस – १ – ५ व ६ नोव्हेंबर
मुंबई-नागपूर-मुंबई सेवाग्राम – २ – ५ व ६ नोव्हेंबर
पुणे-काजीपेठ-पुणे एक्स्प्रेस – १ – ८ व १० नोव्हेंबर
हावडा-मुंबई-हावडा मेल – २ – १५ व १७ नोव्हेंबर
हावडा-मुंबई-हावडा एक्स्प्रेस – २ – २२ व २४ नोव्हेंबर
हटिया-एलटीटी-हटिया एक्स्प्रेस – २ – २० व २२ नोव्हेंबर
हावडा-अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेस – २ – १५ व १८ नोव्हेंबर
हावडा-मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस – २ – १८ व २० नोव्हेंबर
हटिया-पुणे-हटिया एक्स्प्रेस – २ – २७ व २९ नोव्हेंबर