अकोला दिव्य ऑनलाईन : स्वाती इंडस्ट्रिजला कर वसुलीचे काम काम दिले असले तरी, मुळ काम मालमत्ता पुनर्मुल्यांकनाचे म्हणजे प्रॉपर्टी असेसमेंटचे आहे. मात्र स्वाती इंडस्ट्रिजकडे तांत्रिक स्टाफ नसून मालमत्तांची मोजणी केली नाही. त्याच बरोबर जे स्वेच्छेने कराचा भरणा करत आहे. त्यांच्याकडून कर वसुल होत असताना, स्वाती इंडस्ट्रिजला नाहक कमिशन देण्यात आहे. महापालिका आयुक्त व प्रशासकांनी अकोलेकरांवर जबरदस्तीने थोपविला असल्याने तो रद्द करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता निलेश देव यांनी केली आहे.
या विषयी वारंवार शासन, महापालिका यांच्याकडे विविध माध्यमातून पत्रव्यवहार व संपर्क केला. पण काहीही कारवाई करण्यात आली नसल्याने महापालिका प्रशासनाच्या विरोधात उपोषण करावे लागत असल्याचे निलेश देव यांनी सांगितले. लोकांना सोयीसुविधांचा अभाव असून स्वाती इंडस्ट्रिजला मात्र महापालिका खिरापत वाटत आहे. महापालिका कर्मचार्यांना काम नाही. म्हणून उपोषण करण्याचा निर्धार देव यांनी केला.

पालकमंत्र्यांना निवेदन दिले आहे. महापालिका प्रशासनाला देखील अवगत केले.मात्र मनपाच्या वतीने संयुक्त व योग्य उतर प्राप्त झाले नसल्याने २२ जुलै पासुन राऊत वाडी चौकातील, रौनक फर्निचर समोर अन्नत्याग आंदोलन सुरु करण्यात येणार आहे. प्रशासनाचे योग्य सहकार्य न मिळाल्याने नाईजास्तव अन्नत्याग आंदोलन करावे लागत आहे, या आंदोलन दरम्यान जिवाचे बरे वाईट झाले किंवा काही अनुचित प्रकार घडल्यास संपुर्ण जवाबदारी मनपा प्रशासनाची राहिल असे सामाजिक कार्यकर्ता निलेश देव यांनी स्पष्ट केले आहे.
काय आहेत प्रमुख मागण्या :
१. मालमत्ता कर वसुली खाजगी वसुलीस स्थगिती द्यावी.
२. चुकीच्या निविदेत अपहार करुन खाजगी वसुली बंद करा.
३. मालमत्ता मुल्यांकन कामाच्या कंत्राटात वसुलीचे काम कसे.
४. मालमत्ता मुल्यांकन सुरु न केल्याने एजन्सीचे सर्व कामे बंद करा.
५. प्रॉपर्टी असेसमेंट करण्याचा कोणताही अनुभव नसताना काम कसे दिले. याची चौकशी करा.
६. अभय योजनेपुर्वी पैसे भरलेल्या नागरिकांना दिलासा का नाही.
७. अभय योजनेपुर्वी वसुल दंड परत करा, अकोलेकरांना न्याय द्या.
८. कोविड काळातील पाणीपट्टी माफ करुन लोकांना दिलासा द्या.
९. प्रशासकीय इमारतीस स्वातंत्र्य सैनिक दुर्गाताई जोशी नाव द्या.
१०. प्रभाग तीन मधील बंद पाईप लाईन सुरु करण्याची गरज.
११. गुंठेवारी नुसार सामान्य खरेदी व्यवहार चालु करुन न्याय द्यावा
१२. अमृत दोन योजना अकोला (पुर्व) भागातील नवीन वस्ती सुरू. करावी
१३. अमृत २ मध्ये न्यू तापडीया नगर, खरप, उमरी भागात जलवाहिनी व ड्रेनेज टाकावे.
१४. मालमत्ता कर संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल प्रलंबित असताना स्वाती इंडस्ट्रिजला काम कसे दिले. या सर्व मुद्यांचा खुलासा प्रशासनाने करुन स्वाती इंडस्ट्रिजचे काम त्वरीत थांबावे. यासाठी हे आंदोलन सुरु करण्यात येत आहे.असे देव म्हणाले.