अकोल्यातील योगी आदित्यनाथ यांची सभा रद्द : अनेक सभा रद्द केल्या?

0
अकोल्यातील योगी आदित्यनाथ यांची सभा रद्द : अनेक सभा रद्द केल्या?

लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिलला होत असून प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू आहे. दरम्यान 21 एप्रिलला अकोल्यात भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, योगी आदित्यनाथ यांची अकोल्यातील अकोला क्रिकेट क्लब मैदानावर होणारी त्यांची 21 एप्रिलची सभा रद्द करण्यात आली आहे.

“दरम्यान, भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ अद्यापही भाजपचे कोणतेही मोठे नेते अकोल्यात आले नाही हे विशेष. योगी आदित्यनाथ यांची ही सभा कोणत्या कारणाने रद्द करण्यात आली, याची अधिकृत माहिती मिळालं नसून योगी आदित्यनाथ यांनी बऱ्याच सभा रद्द केल्या असल्याची माहिती समोर येत आहे.

या सभेकरिता गेल्या तीन दिवसांपासून भाजप तर्फे जय्यत तयारी करण्यात आली होती, मात्र ऐनवेळी ही सभा रद्द करण्यात आली असून, अकोला क्रिकेट क्लब मैदान येथे मंडप उभारणीचे काम देखील थांबविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here