भाजप व्यापारी आघाडी प्रदेश समन्वयकपदी हरीश आलिमचंदाणी यांची निवड

0
भाजप व्यापारी आघाडी प्रदेश समन्वयकपदी हरीश आलिमचंदाणी यांची निवड

अकोला दिव्य न्युज ब्युरो : महाराष्ट्रातील व्यापार उद्योग क्षेत्रातील विविध समस्या व त्यावरील उपाय योजना लागू करण्यासाठी कार्यरत भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश समन्वयकपदी अकोला शहराचे माजी नगराध्यक्ष आणि उद्योजक व जेष्ठ नेते हरीशभाई आलिमचंदाणी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीच्या प्रदेश कार्यकारणीची महत्वपूर्ण सभा नुकतीच भाजपा प्रदेश मुख्यालय मुंबई येथे भाजपा प्रदेश अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. सभेत महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्यातील व्यापारी आघाड़ीचे पदाधिकारी उपस्थित होते. सभेत व्यापार उद्योग क्षेत्रातील विविध घडामोडींवर चर्चा करून, ज्वलंत समस्या मार्गी लावण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.सभेत भाजपा व्यापारी आघाडी प्रदेश अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी आघाडीला अधिक व्यापाराविमुख करण्यासाठी भाजपचे जेष्ठ नगरसेवक हरीशभाई आलिमचंदाणी यांची समन्वयकपदी नियुक्ती केली.

प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती करुन आपल्यावर व्यक्त केलेला विश्वास कायम ठेवून, व्यवसाय आणि उद्योगातील समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करु असे आश्वासन आलिमचंदाणी यांनी दिले.अकोला दिव्य परिवारतर्फे हरीशभाई आलिमचंदाणी यांचे अभिनंदन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here