Thursday, December 26, 2024
Homeशैक्षणिकहॅपी अवर्स स्कुलतील उपक्रम खरोखरच कौतुकास्पद : आर्किटेक्ट ढोमणे विज्ञान व कला...

हॅपी अवर्स स्कुलतील उपक्रम खरोखरच कौतुकास्पद : आर्किटेक्ट ढोमणे विज्ञान व कला प्रदर्शन उत्साहात

अकोला दिव्य न्युज ब्युरो : विद्यार्थ्यांच्या मनातील भावना, कल्पना आणि जिज्ञासा व्यक्त करण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान आणि विविध प्रकारच्या कला प्रदर्शन आयोजित केल्याने त्यांना चालना मिळेल. शिक्षणासोबतच हॅपी अवर्स स्कुलकडून वेळोवेळी अशा प्रकारचे राबविण्यात येणारे उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे.असे प्रतिपादन आर्किटेक्चर सुधीर ढोमणे यांनी केले.

स्थानिक जठारपेठ स्थित हॅपी अवर्स स्कुलकडून प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित विज्ञान व कला प्रदर्शन आणि आनंद मेळावा उत्साहात पार पडला. या उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन आर्किटेक्चर सुधीर ढोमणे आणि रेखा गोपाल खंडेलवाल यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, पुस्तक वाचन संस्कृती व शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना विरंगुळा म्हणून असे आयोजन केल्याने मानसिक ताण कमी होईल.

तसेच रेखा गोपाल खंडेलवाल यांनी हॅपी अवर्स स्कुलतील शिक्षणाच्या पध्दतीचे तोंड भरून कौतुक करीत, हॅपी अवर्स स्कुलला मदत करण्याचे आश्वासन दिले. शाळेच्या आधारवड आणि संस्थेच्या अध्यक्षा ज्योती सेंगर यांनी पाहुण्यांचे आभार व्यक्त करुन, शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या परिश्रमातून शाळेची सातत्याने प्रगतीकडे वाटचाल सुरू असल्याचे सांगितले.

पाहुण्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रतिकृती बद्दल माहिती घेऊन, काहींना मार्गदर्शन सुध्दा केले. या प्रदर्शनात चिमुकल्यांच्या मनातील भन्नाट कल्पना आणि निर्माण केलेल्या प्रतिकृती बघून आश्चर्य वाटले. कलात्मक पद्धतीने तयार केलेल्या हस्तकला, पेंटिंगसह विविध कलाकृतीने त्यांच्यातील कलागुणांना प्रदर्शनीने वाव मिळाला. जवळपास ५० च्यावर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!