अकोला रिपाईचे (आठवले) पद्माकर वासनिकासह शेकडो कार्यकर्त्यांचा कॉग्रेस पक्षात प्रवेश

0
अकोला रिपाईचे (आठवले) पद्माकर वासनिकासह शेकडो कार्यकर्त्यांचा कॉग्रेस पक्षात प्रवेश

अकोला दिव्य न्युज ब्युरो : देशाचं संविधान वाचवण्याचे काम कॉग्रेस पक्षाचे नेते खा.राहूल गांधी करत असल्यामुळे संविधान वाचण्याच्या लढ्यात सहभागी होण्याकरीता सोनिया गांधी, कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा.मलिकार्जुन खरगे, महाराष्ट्र अध्यक्ष आ. नाना पटोले, अखिल भारतीय कॅाग्रेसचे नेते व माजीमंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच अकोला जिल्ह्यातील सहकार नेते व जिल्हा कॉग्रेसचे जेष्ठनेते सुनिल धाबेकर, युवानेते भूषण गायकवाड यांच्या नेतृत्वात आज १४ जानेवारी २०२४ रोजी स्वराज्य भवन येथे रिपाई आठवले गटाचे पद्माकर वासनिकांसह शेकडो कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.

देशाचं संविधान वाचविण्यासाठी व अकोला शहरासह जिल्ह्यात कॉंग्रेस पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणार आहे. अशी ग्वाही वासनिक यांनी सांगितले. यावेळी गौतम उमाळे, दादाराव वानखडे,मिलिंद गावंडे,संतोष लबडे, विकी गुंजाळ, सतिष दाभाडे,मदन कांबळे,संस्कार ढोके, समर्पन ढोके, प्रेमसुद गद्रे, मनोज इंगळे, रवि गावंडे, सुरज जामनिक, मनिष गुंजाळ, विकास गुंजाळ, सुनिल गुंजाळ, रवि मानकर तसेच शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा जाहिर पक्ष प्रवेश करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते डॉ. सुधिर ढोणे, जिल्हा उपाध्यक्ष डी.ए पाटील, जिल्हासरचिटणीस अंशुमन देशमुख, नागसेन सिरसाट, मनिष मिश्रा उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here