अकोला दिव्य न्युज ब्युरो : सध्याचं युग हे ‘इव्हेंट’ चं युग समजलं जातं. आयुष्यातील आनंदाचे क्षण अधिक सुंदर व अविस्मरणीय करण्यासाठी ‘सोहळ्याच व्यवस्थापन’ हा अतिशय महत्वाचे आहे. अलिकडच्या काळात सोहळा व्यवस्थापनाला ‘इव्हेंट मॅनेजमे़ंट’ नावानं ओळखतो. या क्षेत्रात सध्या राज्यभरात अकोल्याचा ‘डंका’ आणि ‘नाव’ आहे. या क्षेत्रात अकोल्याचे लौकीक होण्याच कारण म्हणजे, कमलेश कोठारी ! आपल्या जगावेगळ्या भन्नाट कल्पनांनी हाती आलेल्या प्रत्येक सोहळ्याचं सोनं केल्याने ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ विश्वात कोठारींची ओळख ‘द कमलेश कोठारी’ अशी झाली आहे.
आज ‘इव्हेंट मॅनेजमेंट’च्या क्षेत्रात शिखरावर असलेल्या कमलेश कोठारींना हे यश सहजासहजी मिळालं नाही. जेवढा संघर्ष मोठा, तेवढं यश नेत्रदिपक, हा विचार त्यांनी आपल्या कृतीतून खरा करून दाखविला आहे. आधीच्या काळात प्रंचड कष्ट उपसत त्यांनी या क्षेत्रातील यशाला गवसणी घातली. पण कोठारी यांची ‘संघर्षगाथा’ फारशी समोर आली नाही. मात्र, त्यांच्या या संघर्षाचे विविधांगी पदर उलगडायला निमित्त मिळालं आहे ‘मारवाड़ी बिज़नेस नेटवर्किंग फाउंडेशन ऑफ़ इंडिया’ च्या नियमित बैठकीचे. ही बैठक असली तरी याचं स्वरूप हे कौटूंबिक स्वरूपाचं असतं. याच बैठकीत कोठारी हे आपल्या संघर्षाचा प्रवास मांडणार आहेत.
हा कार्यक्रम बुधवार १० जानेवारीला रेल्वेस्टेशन मार्गावरील ‘हॉटेल वेलकम इन’ येथे रात्री ८ वाजता होत आहे. या संवादात कोठारी हे आपल्या आयुष्याती संघर्षाचे अनेक क्षण, गोष्टी पहिल्यांदा समाजासमोर मांडणार आहेत. आपल्या संघर्षातून नव्या पिढीला निश्चितच यशाची पायवाट सापडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या कार्यक्रमासाठी ‘मारवाड़ी बिज़नेस नेटवर्किंग फाउंडेशन ऑफ़ इंडिया’ सदस्य नसलेल्या लोकांनी सर्वात आधी आपली नोंदणी करण्याचं आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.