अकोला दिव्य न्युज ब्युरो : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून सन्मित्र पब्लिक स्कूल मध्ये साजरी करण्यात आली. विशेष म्हणजे कार्यक्रमाचे आयोजन सर्व बालिकांनी केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इयत्ता दहावीची मंजिरी मोरे व प्रमुख अतिथी म्हणून गौरी चौबे या बालिका विराजमान होत्या. अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. याप्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आपल्या भाषणातून फाल्गुनी मेढे, श्रावणी देशमुख ,राम इंगोले ,रिद्धी पवार, व स्वरा मुरूमकर या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून अभिवादन केले आणि त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. आज विविध क्षेत्रांमध्ये स्त्रिया सर्वोच्च शिखरावर कार्यरत असून सावित्रींचा वारसा पुढे चालवत आहेत असे सांगितले.
सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यामुळेच आम्ही बालिका आज येथे बोलण्यास समर्थ आहोत असे सांगितले.याप्रसंगी अनुष्का जुनारे हिने ” आय एम ए गर्ल चाइल्ड “ही कविता सादर केली. ज्यामध्ये बालिकेच्या आशाआकांक्षाचे वर्णन केले होते. संस्थेचे अध्यक्ष प्रदीपसिंह राजपूत व प्राचार्या सौ. राजपूत यांनी बालिका दिनानिमित्त सर्व विद्यार्थिनींना हार्दिक शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. बालिकांना शिक्षण, सन्मान व आदर मिळायला हवा, त्यांच्याबद्दल समाजात समानता व सुरक्षेची जाणीव निर्माण व्हावी असे खानझोडे सरांनी आपल्या भाषणातून सांगितले. सुषमा देशमुख यांनी आपल्या भाषणातून सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे संचालन ध्रुवी सोनी व अंकिता शिरसाट या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृंदांनी सहकार्य व प्रयत्न केले. कार्यक्रमाचा शेवट मंजिरी गिर्हे या बालिकेच्या आभार प्रदर्शनाने झाला.