प्रभातची भरारी ! 17 व्या राष्ट्रीय गणित अधिवेशनामध्ये राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक

0
प्रभातची भरारी ! 17 व्या राष्ट्रीय गणित अधिवेशनामध्ये राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक


अकोला दिव्य न्युज ब्युरो : ऑल इंडीया रामानुजन मॅथ्स क्लब व दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 17 व्या राष्ट्रीय गणित अधिवेशनामध्ये प्रभात किड्स स्कूलचा अद्वैत अभिजीत जोशी व चाणक्य संजय झापे यांनी प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकाविला.

दिल्ली वर्ल्ड पब्लीक स्कूल, भाटापारा, छत्तीसगढ येथे पार पडलेल्या राष्ट्रीय गणित अधिवेशनामध्ये भारतभरातून 25 राज्याचे जवळपास 300 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. वर्ग 9 ते 12 च्या अप्पर ग्रुपमध्ये ही राष्ट्रीय स्तरावर प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये प्रभात किड्स स्कूलचा अद्वैत जोशी व चाणक्य झापे या विद्यार्थ्यांनी विविध फेर्‍यांमधून जवळपास 150 विद्यार्थ्यांना मागे टाकत खेळाची चमक दाखवून सुवर्ण पदक प्राप्त केले.
या विद्यार्थ्यांना गणित शिक्षक मिथीलेश दुबे व अर्चना राठी यांचे मार्गदर्शन लाभले. प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे, संचालिका सौ. वंदना नारे, सचिव निरज आवंडेकर, प्राचार्य वृषाली वाघमारे व उपप्राचार्य अर्चना बेलसरे, समन्वयक मो. आसिफ यांच्यासह शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here