३३ खासदार निलंबित ! संसद सुरक्षेवरुन गदारोळ : अधीर रंजन चौधरी यांच्यासह विरोधी खासदार निलंबित

0
३३ खासदार निलंबित ! संसद सुरक्षेवरुन गदारोळ : अधीर रंजन चौधरी यांच्यासह  विरोधी खासदार निलंबित

नवी दिल्ली :  संसदेच्या सुरक्षेतील त्रुटीबाबत सोमवारी सुद्धा विरोधी पक्ष आपल्या मागण्यांवर ठाम राहिले. यावरून लोकसभा आणि राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. दरम्यान, लोकसभा अध्यक्षांनी काँग्रेस नेत अधीर रंजन चौधरी यांच्यासह अनेक विरोधी खासदारांना संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी लोकसभेतून  निलंबित केले.

काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी, के. सुरेश, तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी, सौगता रॉय, प्रतिमा मंडल, द्रमुकचे ए. राजा आणि आरएसपीचे एनके प्रेमचंद्रन यांच्यासह अनेक सदस्यांना सभागृहाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले. दरम्यान, लोकसभेच्या सुरक्षेबाबत दोन्ही सभागृहांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी विरोधी पक्ष सातत्याने करत आहेत.

याआधीही लोकसभेतील १२ विरोधी खासदारांना हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित दिवसांसाठी निलंबित करण्यात आले होते. त्यामध्ये काँग्रेसचे टीएन प्रतापन, हिबी इडेन, जोतिमणि, रम्या हरिदास, डीन कुरियाकोसे, व्हीके श्रीकंदन, बेनी बेहानन, मोहम्मद जावेद आणि मणिकम टागोर यांचा समावेश आहे. द्रमुकच्या कनिमोळी, सीपीआय(एम)चे एस वेक्शन आणि सीपीआयचे के. हे सुब्बारायन आहे. तर टीएमसी सदस्य डेरेक ओब्रायन यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here