अकोला दिव्य न्युज ब्युरो : मानवीय व वैद्यकीय सेवा विश्वात सक्रिय असणाऱ्या सुमिरमा फाउंडेशनचे सेवा कार्य प्रेरणादायी असून यापासून सर्वांनी बोध घेऊन सामाजिक सेवेत आपणास सक्रिय करावे असे आवाहन मान्यवरांनी केले. स्थानीय माहेश्वरी भवनात सुमिरमा फाउंडेशनचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सोहळ्याचे उद्घाटक म्हणून चित्रपट अभिनेते भाऊसाहेब शिंदे होते. फाउंडेशनचे मार्गदर्शक व जेष्ठ समाजसेवी रमाकांत खेतान यांच्या अध्यक्षतेत संपन्न या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अभय पाटील, मनपा नेते साजिदखान पठाण, माजी उपमहापौर निखिलेश दिवेकर, नगरसेवक राजेश मिश्रा, उषा विरक, शिक्षक एम एफ खान, डॉ सतीश राठी, डॉ दीपक केळकर, ज्ञानप्रकाश खंडेलवाल, अग्रसेन भवन ट्रस्टचे माजी अध्यक्ष हरीश खेतान, डॉ आर.बी.हेडा यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रगीताने सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला. स्वागतपर मनोगतात फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ पूजा खेतान यांनी सेवा कार्याची माहिती दिली. प्रास्ताविकात लोकेश शर्मा यांनी फाउंडेशनच्या उपक्रमाची माहिती दिली. यावेळी राजेश मिश्रा, साजिद खान, डॉ अभय पाटील, डॉ केळकर, उषा विरक, खान सर, हरिश खेतान यांनी आपले मनोगत व्यक्त केले मान्यवरांनी फाउंडेशनच्या सेवा कार्याचे कौतुक करीत इतरांनी या सेवा संस्थेच्या कार्याचा वसा घेऊन सामाजिक कार्यात गतिमान होण्याचे आवाहन केले.
यावेळी फाउंडेशनच्या निवड समितीने कला ,साहित्य, क्रीडा, वैद्यकीय, व्यापार, शिक्षण आदी क्षेत्रातून निवड करून त्यांना सन्मानित केले. यावेळी हरीश खेतान व डॉ सतीश राठी यांनी फाउंडेशनच्या सेवाभावी उपक्रमासाठी अकरा हजार रुपये व अन्य मान्यवरांनी सात हजार रुपये देणगी एवढी दिली. संचालन विकास पल्हाडे व कृष्णकुमार शर्मा तर आभार फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी आशिष खिल्लारे यांनी मानलेत. सोहळ्यात व्यापार, उद्योग, कला, क्रीडा व सामाजिक सेवेतील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सफलतेसाठी फाउंडेशनचे विशाल धांडे, निखिल बोडे, संजय ठोके, विनोद इंगळे, संतोष ठाकूर, सागर पाटील, सागर शिंदे, भावना अग्रवाल, अश्विनी परदेशी, कीर्ती काळे, आकाश सोनवणे, आशिष देशमुख ,आनंद गवई, सय्यद जहीर, देवेंद्र तिवारी, प्रमोद जाधव, तेजस मोरे, विकी मोरे, प्रशांत जाधव, विठ्ठल लोखंडे, सुरज हिवाळे, प्रवीण काळे समवेत बहुसंख्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.