अजय देवगनला दुखापत ! ‘सिंघम अगेन’च्या सेटवर ॲक्शन सीक्वेंस शूट करताना जखमी

0
अजय देवगनला दुखापत ! ‘सिंघम अगेन’च्या सेटवर ॲक्शन सीक्वेंस शूट करताना जखमी

अकोला दिव्य न्युज ब्युरो : अभिनेता अजय देवगन सध्या ‘सिंघम अगेन’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अभिनेत्याबाबत एक अपडेट समो आली आहे. रोहित शेट्टी आणि त्याची टीम विले पार्लेमध्ये शूटिंग करत होते आणि त्याचवेळी एका अॅक्श सीक्वेंसमध्ये अजय देवगनला दुखापत झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अजय देवगन एका कॉम्बॅक्ट सीक्वेंसचं शूटिंग करत असताना चुकून एक झटका अभिनेत्याच्या चेहऱ्यावर लागला, त्यामुळे त्याच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. त्याने शूटिंगदरम्यान काही तासांचा ब्रेक घेतला आणि डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. उपचारानंतर अभिनेत्याने पुन्हा शूटिंग सुरू केलं आहे.

‘सिंघम अगेन’ची टीम फिल्म सिटीमध्ये शूटिंग सुरू ठेवणार आहे.रोहित शेट्टीने सिंघम अगेन सिनेमासाठी अजय देवगनसह करिना कपूर खान आणि दीपिका पादुकोणलाही कास्ट केलं आहे. त्याशिवाय सोनू सूद, प्रकाश राज, फरदीन खान, जॅकी श्रॉफ, रणवीर सिंह आणि आपला सिद्धू अर्थात सिद्धार्थ जाधवदेखील सिनेमात भूमिका साकारणार आहे.सिंघम सिनेमाचा तिसरा पार्ट सिंघम अगेनमध्ये अजय देवगन, अक्षय कुमार, रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. सिंघम अगेन सिनेमा २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचं दिग्दर्शन रोहित शेट्टी करणार आहे.

याआधी सिंघम सिनेमाचे दोन पार्ट प्रदर्शित झाले. या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. सिंघम सिनेमाच्या आधीच्या दोन पार्टलाही प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती. रोहित शेट्टीने तिसऱ्या पार्टचे काही फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये गाड्या जळताना दिसत होत्या. त्यावरुन आधीच्या दोन पार्टप्रमाणेच आता तिसरा पार्टदेखील धमाकेदार असेल असं बोललं जात आहे. दरम्यान, अजय देवगन शेवटचं भोला सिनेमात दिसला होता. या सिनेमात अभिनेत्यासोबत तब्बूनेही स्क्रिन शेअर केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here