Friday, November 22, 2024
Homeराजकारणमोठी बातमी ! ठाकरे गटाची २३ जागांची मागणी काँग्रेसने फेटाळली, लोकसभेसाठी जागा...

मोठी बातमी ! ठाकरे गटाची २३ जागांची मागणी काँग्रेसने फेटाळली, लोकसभेसाठी जागा वाटपाचा तिढा वाढणार?

अकोला दिव्य न्युज ब्युरो : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. या ४८ जागांचं विभाजन काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशा तीन पक्षांत करायचं आहे. परंतु, अनेक जागांवर तिन्ही पक्षांचे उमेदवार निवडणूक लढवू इच्छितात. त्यामुळे जागावाटपाचा मोठा तिढा निर्माण झाला आहे.

राज्य पातळीवरील हे वाद राज्यांतर्गत सोडवले जावेत, असा निर्णय इंडिया आघाडीने घेतला आहे. तसंच, इतर अनेक पक्षही महाविकास आघाडीत येण्याची संधी शोधत आहेत. त्यामुळे कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. दरम्यान, जागा वाटपाबाबत ठाकरे गटाने मांडलेला प्रस्ताव काँग्रेसने फेटाळला असल्याचं वृत्त समोर येतंय. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.लोकसभा निवडणुकीकरता ठाकरे गटाने २३ जागांची मागणी केली होती. परंतु, काँग्रेसने ही मागणी अमान्य केली आहे. यासंदर्भात नुकतीस महाविकास आघाडीतील नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत ठाकरे गटाने २३ जागांची मागणी केली होती. परंतु, ही मागणी आता फेटाळून लावण्यात आली आहे.

शिवसेनेची दोन गटांत विभागणी झाली असून ठाकरे गटाने ४८ पैकी २३ जागांची मागणी केली होती. परंतु, त्यांच्यातील बरेच सदस्य एकनाथ शिंदे गटाकडे आहेत. त्यामुळे ठाकरे गटाकडे पुरेसे उमेदवार नसल्याने त्यांच्यापुढे मोठं आव्हान आहे”, असं संजय निरुपम यांनी म्हटलं असल्याचं वृत्त इंडिया टुडेने दिलं. तसंच, “महाविकास आघाडीतील नेत्यांनी जागावाटपाबाबत संघर्ष टाळावा. ठाकरे गट २३ जागांची मागणी करू शकतं. पण या जागांचं ते काय करणार? शिवसेनेतील अनेक नेते एकनाथ शिंदे गटात आहेत. त्यामुळे उमेदवारी देण्याबाबत ठाकरे गटातच मोठं आव्हान निर्माण झालं आहे”, असंही निरूपम म्हणाले.

२३ जागांची मागणी परिस्थितीनुसार नाही
महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडली आहे. त्यामुळे स्थिर मतांचा एकमेव जुना पक्ष आता काँग्रेस आहे, असं महाविकास आघाडीच्या बैठकीत काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट केलं आहे. तर, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण म्हणाले की, पक्षांमध्ये चर्चेची गरज आहे. प्रत्येक पक्षाला जास्त जागांची इच्छा असली तरी, शिवसेनेची २३ जागांची मागणी सध्याच्या परिस्थितीनुसार जास्त आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!