240 जणांचा मृत्यू ! 41 जखमींवर उपचार सुरू

0

अकोला दिव्य न्यूज : एअर इंडियाचे बोईंग ड्रीमलायनर हे विमान कोसळून प्रवासी आणि क्रू मेबर्स अशा २४० जणांचा मृत्यू झाला आहे.मृतकांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाची यांचा समावेश असून रुपाणी इंग्लंड येथे आपल्या पत्नी व मुलींच्या भेटीसाठी विमान प्रवास करत होते. अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या ५ मिनिटामध्ये हे विमान कोसळले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विमानातील २४० जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २०४ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, मृतदेह पूर्णपणे जळलेल्या अवस्थेत आहे. काही मृतदेहांचे शिर आणि इतर अवयव तुटले गेले आहेत. या सगळ्यांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी केली जाणार आहे. पोलीस आयुक्ती दिलेल्या माहितीनुसार ४१ जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

या क्षणाला जे दुःख झालं आहे, ते व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत. ज्यांनी या अपघातात प्राण गमावले आणि जे जखमी झाले आहेत, त्यांच्या कुटुंबीयांसोबत आमच्या सहवेदना आणि प्रार्थना’, अशा शब्दात टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी शोक व्यक्त केला. या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा त्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here