अकोला दिव्य न्युज ब्युरो : संपूर्ण भारतात गोसेवा आंदोलनाचा प्रवर्तक प्रकल्प म्हणून ख्यातनाम अकोला जिल्ह्यातील आदर्श गोसेवा एवं अनुसंधान प्रकल्प प्रख्यात आहे. ब्रह्मलीन डोंगरे महाराजांच्या आज्ञेनुसार हा प्रकल्प प्रस्तावित झाली आणि वाणीभूषण प्रितिसुधाजी यांच्या प्रेरणेतून कामाची उभारणी झाली. गोसेवा व गोरक्षण कार्यात अत्यंत सक्रिय असलेल्या या संस्थेच्या तीन शाखांमधून तेवीसशेच्या जवळपास गोवंशाचे संगोपन होत आहे. यात बहुतांश गोवंश कत्तलीपासून वाचविला गेलेला च आहे. चारा, संगोपन व औषधोपचार या साठी फार मोठा निधी आवश्यक असतो तो समाजातील उदार दानदात्यांकडून उभा होतो.
या वर्षी गायींसाठी चारा निधी जमा करण्यासाठी राजस्थानातील रुणिचा येथील श्रीरामदेव बाबा यांच्या जीवनावर आधारित ‘श्रीरामदेव जीवनलीला’ या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या शनिवार दि. २३ डिसेंबररोजी मुंगीलाल बाजोरिया शाळेच्या मैदानावर सदर महानाट्य होणार असून अकोल्यातील स्थानिक १२५ कलाकार यामधे अभिनय करणार आहेत. या नृत्य नाटीकेत बाबांचा जन्म, बाबांच्या लग्नाची वरात हा आकर्षणाचा भाग आहे. ओरामसा गृपकडून या नृत्यनाटीकेचे नियोजन करत करण्यात येत आहे. कार्यक्रमासाठी रामदेव बाबांचे वंशज हनुमान सिंग तवर राजस्थान वरून येत आहेत.
महानाट्यासाठी प्रवेश निःशुल्क असून उद्या शनिवारी सायंकाळी ७ ते १० या वेळेत होणारे महानाट्य शासकीय नियमानुसार वेळेवर कार्यक्रम संपविण्यासाठी सर्व प्रेक्षकांनी साडेसहा वाजता आपल्या स्थानापन्न व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.