Friday, November 22, 2024
Homeशैक्षणिकविद्यार्थ्यांनी स्वतःचे व्यक्तीमत्व विकसीत करणे आवश्यक : सेवानिवृत्त एअरफोर्स ऑफीसर

विद्यार्थ्यांनी स्वतःचे व्यक्तीमत्व विकसीत करणे आवश्यक : सेवानिवृत्त एअरफोर्स ऑफीसर

अकोला दिव्य न्युज ब्युरो : विद्यार्थ्यांनी करिअरसाठी सैन्यातील अधिकारी किंवा इतर कुठलेही क्षेत्र निवडण्याआधी स्वतःच्या व्यक्तीमत्वाचा विकास करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सेवानिवृत्ती एअरफोर्स ऑफीसर अमोल जवळकार यांनी केले.
प्रभात किड्स स्कूलमध्ये ’वीर गाथा’ या सीबीएसईच्या प्रकल्पाअंतर्गत आयोजित व्याख्यानामध्ये ते विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना बोलत होते.

प्रत्येक विद्यार्थ्याने आपला स्वभाव, आवड आणि क्षमता ओळखून त्यानुसार करिअर निवडले तर त्याला खरे समाधान मिळेल, असे ही ते पुढे म्हणालेत. एअरफोर्समध्ये असतानाचे अनेक थरारक अनुभव देखील त्यांनी शेअर केले. तसेच खूपसारी तांत्रीक माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरे अमोल जवळकार यांनी देऊन विद्यार्थ्यांचे समाधान केले.

पठाणकोट, सीमारेषेवर, लेहलड्डाख मधील वातावरण व सैन्यादरम्यान झालेल्या प्रशिक्षणाचे अनुभव ऐकतांना विद्यार्थी अक्षरशः भारावून गेले होते. सैन्यभरतीची संपूर्ण प्रक्रिया विद्यार्थ्यांनी समजावून घेतली. कार्यक्रमाच्या सुरुवातील प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे यांनी अमोल जवळकार व खास इंग्लंडवरुन या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले इंजीनिअर अतुल जवळकार यांचा प्रभात परिवाराच्या वतीने सत्कार केला. यावेळी प्रभातच्या संचालिका सौ. वंदना नारे, प्राचार्य वृषाली वाघमारे यांची मंचावर उपस्थिती होती. उपप्राचार्य अर्चना बेलसरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून देऊन आभार प्रदर्शन केले. प्रभातच्या 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांनी या सत्राचा लाभ घेतला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!