अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोला शहर व परिसरातील संगीतप्रेमीं आणि युवापिढीला ‘क्रेझ’ असलेले ‘रॉक म्यूजिक’ या पाश्चात्य संस्कृतीमधील संगीत व रॉक गायनाची वाढती मागणी लक्षात घेऊन अकोला शहरातील ‘मिस्टिक इवेंट्स’ तर्फे
प्रसिद्ध गायक आसित त्रिपाठी, रानी इंद्राणी शर्मा आणि अन्य प्रसिद्ध कलाकारांच्या नाविन्यपूर्ण गायन आणि वादनाच्या ‘रॉक ऑन’ लाइव म्यूजिकल कॉन्सर्ट कार्शयक्रम शनिवार 23 डिसेंबरला ‘द ग्रैंड जलसा’ मध्ये आयोजित करण्यात आले आहे.
सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षचे स्वागत सर्वचजण उत्साहाने साजरा करतात, हे लक्षात घेऊन ‘मिस्टिक इवेंट्स’ तर्फे नवीन वर्ष 2024 चे स्वागत करण्यासाठी ख्यातनाम गायकांच्या गायन आणि वादनाचा कार्यक्रमाची ही एक मेजवानीच आहे. युवापिढीत लाइव म्यूजिकल कॉन्सर्टची खास मागणी असून संगीताकडे त्यांचा वाढता कल बघून मिस्टिक्स इवेंट्सने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अकोल्यातील एकता अग्रवाल, कीर्ती तातीया, शुभांगी ठाकरे, तेजल मेहता आणि दारव्हा येथील वंदना अग्रवाल या पाच व्यवसायीक महिलांनी मिस्टिक इवेंटची स्थापना केली आहे आणि या संपूर्ण कार्यक्रमाचे आखीव रेखीव नियोजन देखील महिलांनी केले आहे.
अकोला शहरातील अशा प्रकारचे हे पहिले आयोजन आहे. या महिला व्यावसायिकांचा हा उपक्रम खरोखरच साहसी असून, त्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. आसीत त्रिपाठी, रानी इंद्राणी शर्मा, राशिद खान, गोपाल तिवारी, राहुल शर्मा सारखे ख्यातनाम कलावंत ‘गीत-संगीत’ लाइव परफॉर्मेंस करणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिल्लक उत्पन्नातील काही रक्कम महिला, बाल कल्याण आणि विकलांग यांच्या विविध सामाजिक कार्यक्रमांवर खर्च करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे प्रायोजक निवारण अपैरल , सनशाइन इंजीनियरिंग, विट्ठल आईल असून चॅनल पार्टनर आरसी नेटवर्क आहे.
कार्यक्रमाचे तिकीट शहरातील विविध ठिकाणी उपलब्ध आहेत. टिकट बुकिंग ‘माय शो’आणि अन्य चॅनलच्या माध्यमातून प्राप्त केल्या जाऊ शकतात.