Saturday, April 26, 2025
HomeUncategorizedअकोल्यातून मोठी बातमी ! नशीब बलवत्तर म्हणून 30 पर्यटक पहलगामला पोहोचण्यापूर्वी घटना...

अकोल्यातून मोठी बातमी ! नशीब बलवत्तर म्हणून 30 पर्यटक पहलगामला पोहोचण्यापूर्वी घटना घडली

गजानन सोमाणी : अकोला दिव्य न्यूज : देशाच्या २५ वर्षांत काल पहिल्यांदाच झालेल्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल २६ पर्यटकांचा मृत्यूने देशभरात प्रचंड असंतोष निर्माण झाला असताना, अकोला शहरातील तब्बल 30 पर्यटक आणि त्यांच्या कुटुंबीयांचे नशीब बलवत्तर म्हणून हे सर्वजण पहलगाम येथे जाण्यापूर्वी हा हल्ला झाला आणि थोडक्यात सर्वजण बचावले. हल्ला झाला होता तेव्हा हे सर्वजण सोनबर्गला होते.आता ते श्रीनगरला सुरक्षित आहेत.

अकोला येथील गुरूमाऊली टुर्स आणि ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून अकोला शहरातील अशोक आमले, गुम्फा आमले, मुग्धा देशमुख, मंगल वैद्य, शुभम डोमकुलवार, वर्षा मराठे, माधुरी दामले, रवींद्र रोही, रजनी रोही, मंगेश अंबरखाने, सुनीता अंबरखाने,अभिषेक शिंगरुप, मंजुश्री शिंगरुप, इंद्राणी शिंगरुप,आरोही शिंगगरुप, संदीप सकडकळे, प्रेरणा सकडकळे, गंगा बोरडकर, शुभा कुलकर्णी, शिला भोपले, अशोक बडगुजर, अर्चना बडगुजर, अभिषेक बडगुजर, माया बडगुजर, राजेश्री शर्मा, सुनदा नवले, प्रदीप देव, संगिता देव,पंकज साहू आणि अंबादास सप्रे हे जम्मू काश्मीर पर्यटनासाठी गेले होते. या प्रवासात ते पहलगाम येथे जाणार होते. जम्मू येथील पर्यटन स्थळे बघून पहलगामसाठी मार्गस्थ झाले होते.

पहलगाम पुर्वी सोनमर्ग येथील पर्यटन करीत असताना ही घटना घडली. त्यानंतर सर्वांना श्रीनगरला नेण्यात आले.आज बुधवारी सर्वजण घाट क्रमांक 6 समोरील हाऊस बोट मध्ये मुक्कामी राहणार असून ते सुरक्षित आहेत. ही घटना घडल्यानंतर काहींनी अकोला येथील डॉ.माधव देशमुख यांच्यासोबत संपर्क साधला.डॉ. देशमुख यांचं श्रीनगरला ऑफिस असून श्रीनगर मधील देशमुख यांचे सहकारी फारूक यांनी तातडीने पावले उचलत मार्गदर्शन करीत अकोल्यातील या 30 पर्यटकांना श्रीनगरला सुरक्षित आणले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!