Saturday, April 19, 2025
HomeUncategorizedनांदुरा जवळ भीषण अपघात ! ३५ जण जखमी, तिघांची प्रकृती गंभीर

नांदुरा जवळ भीषण अपघात ! ३५ जण जखमी, तिघांची प्रकृती गंभीर

अकोला दिव्य न्यूज : देवदर्शनासाठी निघालेली भाविकांची बस उभ्या ट्रकवर धडकल्याने झालेल्या अपघातात ३५ जण जखमी झाले असून ३ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त हाती आले आहे. ही घटना नांदुरा दरम्यानच्या काटी फाट्याजवळ काल मध्यरात्रीनंतर घडली.तातडीने जखमींना उपचारासाठी मलकपूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.१० जखमींना पुढील उपचारासाठी बुलढाणा येथे पाठवण्यात आले आहे.

बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर धुळे या राष्ट्रीय महामार्ग क्र.५६ वरील मलकापूर ते नांदुरा दरम्यान काटी फाट्या जवळ रात्री ३ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची खाजगी बस उभ्या ट्रकवर धडकली असून या अपघातात जवळपास ३५ भाविक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.घटना घडताच जवळच असलेल्या एका धाब्यावर उपस्थित असलेल्या लोकांनी लगेच धाव घेऊन मदत केली.

मलकापूर ग्रामीणचे ठाणेदार संदीप काळे गस्तीवर असताना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. तातडीने जखमींना उपचारासाठी मलकपूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.नंतर १० जखमींना पुढील उपचारासाठी बुलढाणा येथे पाठवण्यात आले.तर ३ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. हे भाविक आंध्रप्रदेश राज्यातील कडप्पा येथील असून ते नाशिक, शिर्डीला देवदर्शानासाठी जात होते.

बुलढाणा जिल्ह्यात मुख्यतः घाटाखाली मागील दोन आठवड्यामध्ये तीन भीषण अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या अपघातांमध्ये जवळपास आठ ते दहा जणांचा मृत्यू झाला आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये जसजसे आता पर्यटक घराबाहेर पडत आहे आणि वाहनांचा सुसाट वेग गुळगुळीत रस्ते अनियंत्रित वेग यामुळे मुख्यतः सकाळच्याच वेळेस आणि रात्रीच्या वेळेस हे अपघात झाल्याचे समोर येत आहे. अनेक वेळा रस्ते परिवहन महामंडळाच्या वतीने सूचनाफलक धोक्याचे वळण याबाबत जनजागृती नामनिर्देशक फलक हे जागोजागी लावलेले असतात. मात्र, याकडे लोक बऱ्याचदा दुर्लक्ष करतात.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!