अकोला दिव्य न्यूज : पाटील समाजातील वधू वर परिचय पुस्तिका ‘योगायोग’चा प्रकाशन सोहळा मराठा सेवा संघाच्या कार्यालयात उत्साहात संपन्न झाला. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी युवा नेते मंगेश काळे, पंकज साबळे, पाटील समाजाचे उपाध्यक्ष विनायकराव शेळके, सुरेश गाढे पाटील, कार्याध्यक्ष सुनील जानोरकर, कोषाध्यक्ष राजेंद्र मोहोकार, सहसचिव विजय बोरकर, मराठा पाटील समाज बाळापुरचे अध्यक्ष शरद वानखडे, माजी जि. प सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी, बाळासाहेब तायडे, रेखा राऊत, अप्रतिम जोडीच्या संयोजिका अर्चना पाटील, राम मुळे, गजानन हरणे, राजाभाऊ पाथरीकर, अविनाश पाटील, प्रामुख्याने उपस्थित होते.
योगायोग पुस्तिकेचे उत्कृष्ट संपादन केल्याबद्दल पाटील समाजाचे सचिव प्रदीप खाडे यांचा अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पाटील समाजाचे सदस्य राजदत्त मानकर, प्रा.तुकाराम बिडकर, अ.भा.मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सिंह महाडिक यांच्या निधनाबद्दल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

प्रास्ताविकात खाडे यांनी योगायोग पुस्तिका प्रकाशित करण्याचा हेतू विशद केला. यावेळी मंगेश काळे, सुनील जानोरकर, रेखा राऊत, अर्चना पाटील यांनी समाजाच्या एकत्रीकरणाची गरज तसेच युवा पिढीने सामंजस्याची भूमिका घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास देवराव हागे पाटील, संदीप महल्ले, गुणवंतराव जानोरकर, दिनकरराव सरप, तुषार जायले, निलेश पवित्रकार, देवेंद्र ताले, सुधाकर वानखडे, उर्मिला कांगटे, शितल सगनें, दिलीप मानकर, वसंत पोहरे, गजानन वानखडे, योगेश थोरात, गणेश कावरे, संजय राऊत, डॉक्टर टापरे, राजाराम मानकर, डॉ. मोहन मुठाळ, प्रा. दत्तात्रेय भाकरे, रमेश साबे, गणेश कावरे, शंकरराव टाले, रामदास मंगळे व इतरही नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रदीप खाडे यांनी केले.