डॉ. नितीन ओक : अकोला दिव्य : सध्या आकाशात ४.५× १० किमी अंतरावरून एक पाहुणा आलेला दिसतो आहे. कालपर्यंत हा पाहुणा SWAN 25 F नावाने ओळखला जात होता, पण इंटरनेशनल अँस्ट्रॉनॉमिकल युनिअन्स मायनर प्लॅनेट सेंटरने याचं अस्तित्व स्वीकारून, आता याच नावाने बारसं केल आहे. त्याचे नाव ठेवले C/2025 F2 SWAN. हा पाहुणा आस्ट्रेलीयातील हौशी खगोल अभ्यासक आणि युक्रेनच्या खगोल अभ्यासकांनी शोधला आहे.

संग्रहित छायाचित्र
२९ मार्चला व्लादिमीर बेझुग्ली (युक्रेन) आणि मिचेल मॅटिॲझो (ऑस्ट्रेलिया) यांनी टेलिस्कोपचा वापर न करता हा पाहुणा शोधला. नासाची SOHO नावाची दुर्बीण हबलसारखी अवकाशात फिरते आहे. त्याचे सोलर अँड हेलीओस्परिक आबसरवेटरी नाव आहे. या कॅमेऱ्याने घेतलेले फोटो खगोलशास्त्राशी संबंधित लोक पाहू शकतात.
या फोटोचा अभ्यास करून या पृथ्वीच्या दोन टोकावर असलेल्या हौशी खगोल अभ्यासकांनी या पाहुण्याला ओळखले. तो पहिले SWAN 25 F नावाने जगापुढे आला आणि मान्यता पावल्यावर त्याचे नाव ८/2025 F2 SWAN असे झाले. हा धुमकेतू सर्वांना निश्चितपणे पाहता येणार आहे. हा धुमकेतू ‘हलेचा धुमकेतू’ म्हणजे ७६ वर्षांनी सूर्याकडे येणारा धुमकेतू म्हणून प्रसिद्ध आहे.
हा धुमकेतू सूर्यमालेचे रहस्य उलगडू शकतो..… अत्यंत वेगाने हा कसिओपीया या प्रसिद्ध तारकासमूहात प्रवेश करेल. ‘शर्मिला’ नावाने ओळखले जाणारे हे नक्षत्र पूर्वेकडे खाली दिसेल, म्हणजे सूर्याकडे – नंतर हा धुमकेतू सूर्याच्या प्रभेमध्ये हरवेल – १ मे रोजी आपण महाराष्ट्र दिन साजरा करत असून, जग कामगार दिन साजरा करत असेल, तेव्हा हा धुमकेतू सूर्याच्या सगळ्यात जवळ असेल. तोपर्यंत मिळविलेल्या वेगाच्या भरवशावर हा सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाच्या तडाख्यातून सुटला, तर संध्याकाळच्या आकाशात हा बऱ्यापैकी प्रखर असेल. एव्हाना याबाबत अभ्यास सुरू झाला आहे.
या धुमकेतूला दोन शेपट्या आहेत. एक त्यातल्या अतिथंड वस्तुमानाची होणारी वाफ आणि दुसरे सूर्याच्या प्रचंड मॅग्नेटिक फिल्डमुळे तयार होणारी अत्यंत अंधुक अशी ‘आयानिक’ टेल. याचा अभ्यास करून यात कोणते मूलद्रव्य आहेत? किती आहेत? याचा आभ्यास सुरूही झाला. कोणताही धुमकेतू सूर्यमालेचे किंवा सजीवसृष्टीचं रहस्य उलगडू शकतो. हे धुमकेतू सूर्यमालेच्या अतिशीत भागातून येतात. म्हणजे आपल्या भाषेत हा सूर्यमालेचा रेफ्रिजरेटर आहे. ज्यात ठेवलेल्या वस्तू खराब होत नाहीत. म्हणूनही शीतपेटीतील अभ्यासाला शास्त्रज्ञ सज्ज आहेत. आपण अभ्यासू शकत नसलो, तरी निदान तो पाहायला घराबाहेर तर पडू शकतो.

धुमकेतू एवढा महत्त्वाचा का?
१ सजीवांची सुरुवात पृथ्वीवर न होता, अवकाशात कुठेतरी झाली आणि धुमकेतूच्या माध्यमातून ती पृथ्वीवर आली, म्हणजे धुमकेतूंचा अभ्यास करताना केवळ सूर्यमालेचे रहस्य नव्हे, तर सजीवांच्या जडणघडणीचे रहस्य शोधण्याचा प्रयत्न करण्यात येतो.
२ सध्या हा धुमकेतू साध्या डोळ्यानी पाहण्याइतका तेजस्वी नाही, पण छोट्या ४ इंची टेलिस्कोपमधून किंवा 8×50 किंवा 10×50 च्या दुर्बिणीने दिसू शकतो. हा पाहण्यासाठी सकाळी ४-४:११ वाजता शहरापासून थोडं दूर जावं लागेल. सूर्योदयाच्या साधारण तासभर आधी पूर्व-उत्तर आकाशात पाहिल्यावर दुर्बिणीतून तुम्हाला हा धुमकेतू पिंजलेल्या कापसासारखा दिसेल.
३ फोटोमध्ये जो दाखवतात, तो साधारण २० ते ३० फोटो एकत्र करून तयार केलेला फोटो असतो. याला शोधण्याआधी पूर्व-उत्तर आकाशात एक मोठा चौकोन शोधा. याला ‘पेगॅसीस’ कॉन्स्टेलेशन म्हणतात. मराठीत याला उच्चेश्रवा (पंखवाला घोडा) नक्षत्र म्हणतात. याच्या पूर्वेकडच्या ३/५ तारा अल्फेरार्ट्स नावाने आळखला जातो, चौकोनाच्या चार कोपऱ्यांपैकी हा सगळ्यात प्रखर याच्याजवळ हा कापसाचा पुंजका दिसेल.