अकोला दिव्य न्यूज : राजस्थान राज्य 1949 मध्ये अस्तित्वात आल्यानंतर राजस्थानी लोकांच्या शौर्याला, प्रबळ इच्छाशक्तीला आणि बलिदानाला मानवंदना म्हणून राजस्थानी स्थापना दिवस दरवर्षी साजरा केला जातो. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यासह अकोला शहरात दरवर्षी गुडी पाडव्याच्या दिवशी राजस्थानी दिवस साजरा केला जातो. दरवर्षी प्रमाणे यंदा ३० मार्चला अर्थात गुडी पाडव्याला राजस्थानी सेवा संघाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राजस्थान दिवसाला संपूर्ण विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, ज्यात पारंपरिक संगीत, नृत्य आणि कवी संमेलनासह मनोरंजक कार्यक्रम समाविष्ट असतात.

अकोला येथील राजस्थानी सेवा संघाच्या वतीने राजस्थानी दिनानिमित्त अखिल भारतीय कवींना आमंत्रित केले गेले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह येथे रविवार ३० मार्चला सायंकाळी ६.३० ते रात्री १० वाजेपर्यंत होऊ घातलेल्या कवी संमेलनात इंदौर येथील ख्यातनाम गीतकार अमन अक्षर तर जबलपूर येथील पारंपारिक कवी सूरजराय सूरज, प्रतापगड येथील विनोद आणि व्यंग्यात्मक विडंबनकार पार्थ नवीन आणि रायसेन येथील ओजस आणि शौर्य कवी गौरीशंकर धाकड आपल्या रचना सादर करणार आहेत.
कार्यक्रमातील कवी व गीतकार यांच्या मंचकाचे संचालन पश्चिम विदर्भातील यवतमाळ येथील ख्यातनाम हास्य-व्यंग कवी आणि मंच संचालक कपिल जैन करणार आहेत. अकोल्याचे सुपुत्र व जेष्ठ साहित्यिक आणि हास्य-व्यंग कवी घनश्याम अग्रवाल संचालनाला सहाय्य करीत आपल्या रचना सादर करणार आहेत. अकोला शहरातील राजस्थानी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून राजस्थानी दिवसाचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
राजस्थान स्थापना दिवस:
30 मार्च 1949 रोजी, जोधपूर, जयपूर, जैसलमेर आणि बिकानेर या संस्थानांचे विलीनीकरण करून ‘ग्रेटर राजस्थान’ ची निर्मिती झाली, ज्याला राजस्थान स्थापना दिवस म्हणून ओळखले जाते.
राजस्थान दिवस संपूर्ण राज्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा केला जातो, ज्यात पारंपरिक संगीत, नृत्य आणि मनोरंजक कार्यक्रम समाविष्ट असतात. राजस्थानची संस्कृती विविध रंगांची आणि पारंपरिक कला प्रकारांची आहे, जी या दिवसात विशेषत्वाने दर्शविली जाते.
