अकोला दिव्य न्युज ब्युरो : शिवसेनेच्या १६ आमदारांच्या निलनंब प्रकरणाच्या निकालाचं लेखन करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टात २१ जानेवारीपर्यंत वेळ वाढवून मागितला होता. सुप्रीम कोर्टानं राहुल नार्वेकर यांना थोडासा दिलासा दिला आहे. राहुल नार्वेकर यांना शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर अंतिम निर्णय घेण्यासाठी १० जानेवारीची मुदत देण्यात आली आहे.शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात राहुल नार्वेकर यांना थोडासा दिलासा मिळाला आहे.
राहुल नार्वेकर यांच्यावतीनं तुषार मेहता यांनी तीन आठवड्यांचा वेळ मागितला. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी अध्यक्षांकडून वेळकाढूपणा होत असल्याचा युक्तिवाद केला होता. राहुल नार्वेकर यांनी तीन आठवड्यांचा वेळ मागितला होता. मात्र, सुप्रीम कोर्टानं राहुल नार्वेकर यांना १० जानेवारीपर्यंत वेळ दिला आहे.
राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाकडे बाजू मांडताना २० डिसेंबरपर्यंत निर्णय सुरक्षित ठेवणार असल्याचं म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टातील यापूर्वीच्या सुनावणीत या बाबतचा अंतिम निर्णय ३१ डिसेंबरपर्यंत घेण्याचे आदेश राहुल नार्वेकर यांना दिला होता. आता, राहुल नार्वेकर यांना १० दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे.
१० जानेवारीपर्यंत राहुल नार्वेकर यांना निर्णय घ्यावा लागणार
राहुल नार्वेकर यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात २१ जानेवारीपर्यंत निकाल जाहीर करण्यास मुदतवाढ मागण्यात आली होती. राहुल नार्वेकर यांच्या मागणीवर सुप्रीम कोर्टानं १० दिवसांचा वेळ वाढवून दिला आहे. त्यामुळं आता शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रता प्रकरणाचा निकाल १० जानेवारीपर्यंत लागणार आहे.राहुल नार्वेकर यांच्याकडून सुप्रीम कोर्टात यापूर्वी झालेल्या सुनावणीत शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रता प्रकरणाचा निकाल लावण्यासाठी ३१ जानेवारीची मुदत मागण्यात आली होती. मात्र, सुप्रीम कोर्टानं ३१ डिसेंबरची मुदत दिली होती.
यानंतर राहुल नार्वेकर यांनी मुंबईत आणि नंतर हिवाळी अधिवेशन सुरु झाल्यानंतर नागपूरमध्ये सुनावणी घेतली होती. यामध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीनं जोरदार युक्तिवाद करण्यात आला होता.