Thursday, November 21, 2024
Homeआरोग्यफक्त 15 दिवसांत बना पोलादी ! Protein Powder चा बाप आहे ही...

फक्त 15 दिवसांत बना पोलादी ! Protein Powder चा बाप आहे ही घरगुती पावडर

अकोला दिव्य न्युज ब्युरो : तुम्ही नेहमी थकलेले असता का आणि तुम्हाला अशक्त[पणा वाटतो का? तुम्हाला खूप आळस येतो का आणि तुमच्या गुडघ्यांमध्ये वेदना होतात का? तुम्ही जिममध्ये जाता आणि बाजारातील महागडे Protein Powder सुद्धा खाता, पण तरी तुमचे शरीर तंदुरुस्त होत नाही का? जर तुम्ही या समस्यांमधून जात असाल तर तुम्हाला तुमची प्रोटीन खाण्याची पद्धत बदलावी लागेल.जर तुम्ही नेहमी अशक्तपण फील करत असाल, तुमच्या शरीरात प्राण नसतील किंवा गुडघे दुखत असतील, तर तुम्ही बाजारात मिळणाऱ्या प्रोटीन पावडरचा आहारात समावेश करण्याऐवजी घरी बनवलेल्या प्रोटीन पावडरचा समावेश करावा. तज्ञांनी सांगितले आहे की तुम्ही घरी देसी प्रोटीन कसे बनवू शकता आणि त्याचे फायदे काय आहेत.

देसी प्रोटीन पावडर बनवण्यासाठी सामग्री : 60 ग्रॅम भाजलेले हरभरे, 2 खजूर,1 केळी, 1 ग्लास दूध, थोडासा गूळ

देसी पावडर शेक बनवण्याची पद्धत : सर्व प्रथम हरभरे मिक्सरमध्ये टाकून चांगले मिक्स करून त्याची मऊशार बारीक पावडर बनवा. याला सामान्यतः चण्याचे सत्तू असे म्हणतात जो प्रथिने, कॅल्शियम आणि लोहाचा मजबूत स्रोत आहे.
या देसी पावडरमध्ये केळी, खजूर, गूळ आणि दूध घालून मिक्स करा.चला, तुमचे देसी प्रोटीन तयार आहे.

फिटनेस एक्सपर्टने सांगितले की, हे मिश्रण फक्त 15 दिवस सेवन केल्याने तुम्हाला आश्चर्यकारक फायदे दिसू लागतील. जर तुम्हाला अशक्तपणाचा त्रास होत असेल तर तुम्ही याचे सेवन अवश्य करा. प्रथिनाशिवाय शरीराच्या विकासासाठी आवश्यक असलेले सर्व पोषक घटक त्यात आढळतात.तज्ज्ञांनी सांगितले की, ज्यांच्या शरीरात अशक्तपण आहे आणि गुडघे दुखत असल्याची तक्रार असेल त्यांनी या मिश्रणाचे सेवन जरूर करावे. शरीराला उर्जेने भरण्यासाठी हे एक परिपूर्ण फूड आहे.प्रथिने आणि कॅल्शियमचे हे शक्तिशाली मिश्रण प्यायल्याने तुम्हाला फक्त 15 दिवसात तुमच्या शरीरात फरक जाणवू लागेल. जर तुम्ही जिममध्ये गेलात तर वर्कआऊटनंतर प्रोटीन पावडरऐवजी हे मिश्रण घेतल्याने तुम्हाला जास्त फायदा होईल.

डिस्क्लेमर: हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!