Wednesday, March 12, 2025
HomeUncategorizedरक्षक झाले भक्षक ! महिला दिनालाच पोलिसाने केला महिलेवर बलात्कार

रक्षक झाले भक्षक ! महिला दिनालाच पोलिसाने केला महिलेवर बलात्कार

अकोला दिव्य न्यूज : महाराष्ट्र राज्यात दररोज गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे सामान्य माणूस अक्षरशः हादरला आहे. मराठवाड्यातील गुन्हेगारांना राजकीय पाठबळ मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गुन्हेगारीमुळे बीड जिल्हा देशभरात चर्चेत आला असून, महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला बोलावलेल्या महिलेवर चक्क पोलिसाने बलात्कार केल्याची घटना घडल्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलिसच अशा घटना करायला लागले तर सर्वसामान्यांनी विश्वास कुणावर ठेवायचा ? रक्षकच भक्षक झाल्याने घडलेल्या घटने संदर्भात महिलांमध्ये संतप्त प्रतिक्रीया उमटत आहे.

यासंदर्भात पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार गेवराई तालुक्यातील महिला काही प्रकरणात पाटोदा पोलीस ठाण्यात ये-जा करीत असल्याने पाटोदा पोलीस ठाण्यातील बीट अमलदार उद्धव गडकर कर्मचाऱ्याच्या संपर्कात आली होती. यानिमित्ताने मोबाईल क्रमांकांची देवाणघेवाण झाली यातून त्यांच्यात संभाषण आणि मेसेज आदी होती यांच संधीचा लाभ घेत त्या कर्मचाऱ्याने महिला दिनाचे निमित्त सांगून त्या महिलेला पाटोदा येथे बोलावून घेतले होते.

ती महिला पाटोद्यात आली असता स्टेट बँकच्या बाजूला घेऊन जात महिलेवर बलात्कार केला. यावेळी त्या महिलेने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला मात्र तिला चोरीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत बलात्कार केला. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ती महिला तक्रार दाखल करण्यासाठी पाटोदा पोलीस ठाण्यात येवून स्वतः पोलीस निरीक्षक यांच्या समोर झालेली घटना सांगितली.

दुपारी १ वाजल्यापासून ती महिला पोलीस ठाण्यातच बसून होती. घटनेची गांभीर्य पाहून पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हुनगुडे पाटील यांनी पाटोदा पोलीस ठाण्यात भेट देत व तपासासंदर्भात सुचना केल्या. संध्याकाळी ६-३० सुमारास त्या महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी बीड येथे पाठविण्यात आले आहे. त्या पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्हा क्र 77/25 भा.द.वी 64/2 -A(1) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पाटोदा पोलीस निरीक्षक जाधव करीत आहेत. या घटनेची सर्वत्र चर्चा होत असून रक्षकच भक्षक झाल्याचं बोललं जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!