अकोला दिव्य न्यूज : आपल्या व्यवसायासोबत सनदी लेखापाल अभ्यासक्रम करणारे आणि भविष्यातील सनदी लेखापाल युवकांना योग्य मार्गदर्शन करीत विविध सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन सामाजिक दायित्व पार पाडण्यास कार्यरत अकोला येथील दि.इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउन्टन्स ऑफ इंडिया, अकोला शाखेच्या २०२५-२९ या पुढील ४ वर्षाच्या कालावधीसाठी पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांसह कार्यकारिणी मंडळाची अविरोध निवड करण्यात आली.

पुढील कालावधीसाठी झालेल्या अविरोध निवडणुकीत अध्यक्ष म्हणून सीए.धीरज चांडक तर उपाध्यक्ष सीए. रोमील सोजतीया, सचिवपदी सीए. श्याम माहेश्वरी, कोषाध्यक्ष सीए. विशाल राजपाल आणि विकासा अध्यक्ष म्हणून सीए.प्रतिक मंत्री, कार्यकारिणी सदस्यपदी सीए.मनोज चांडक यांची निवड करण्यात आली.

मावळते अध्यक्ष सीए सुमित अलिमचंदानी यांनी नुतन अध्यक्ष सीए धीरज चांडक यांचे पुष्पगुच्छ देउन अभिनंदन केले. तसेच भविष्यात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
नुतन अध्यक्ष सीए. धीरज चांडक यांनी सनदी लेखापाल व विद्यार्थी यांच्या सर्वांगीण विकासाकरिता तसेच विवीध समाजपयोगी कार्यक्रम राबविण्याचे आश्वासन दिले.
निवडणुक अधिकारी म्हणून सीए. प्रकाश भंडारी यांनी कामकाज केले.अशी माहिती शाखेचे जनसंपर्क समितीचे अध्यक्ष सीए. रमेश चौधरी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्राद्वारे कळविल