अकोला दिव्य न्युज ब्युरो : ग्रामपंचायत सरपंचाकडुन अधिकारी व संबंधितांची दिशाभूल करणा-या खोट्या तक्रारी करुन जलजीवन योजनेच्या कामात खोडा घातला जात आहे.सरपंचाच्या गलिच्छ राजकारणाने मात्र साल्पी (वाल्पी) गावातील नागरीकांना स्वच्छ व गोड पाण्यापासून वंचीत आहेत. सरपंचांनी याविरोधात बेकायदेशीर सुरू केलेले उपोषण केवळ शासकीय काम अडविण्यासाठी आहे. तेव्हा जलजीवन योजनेचे काम तातडीने पूर्ण करून साल्पी वाल्पी येथील नागरीकांना स्वच्छ व गोड पाणी उपलब्ध करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी साल्पी (वाल्पी) ग्रामपंचायत उपसरपंच आणि सदस्यांनी केली आहे. आता, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी काय कार्यवाही करतात याकडे लक्ष लागले आहे.
संग्रहित छायाचित्र आहे
बार्शिटाकळी तालुक्यातील ग्रामपंचायत साल्पी (वाल्पी) येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा व विहीर खोदकाम सुरू करण्यात आले. मात्र साल्पी येथील सरपंच अतुल गोपाळ चंदापुरे विनाकारण खोट्या तक्रारी करण्याचा सपाटा लावला आहे. या योजनेकरीता अगोदर साल्पी येथै ई-क्लास जमीनीवर दोन बोअर करण्यात आले, मात्र त्याला पाणी लागले नाही. तेव्हा नागरिकांची गरज लक्षात घेऊन उदय मंदापुरे कोणत्याही प्रकारचा मोबदला न घेता त्यांनी ई-क्लास जमीनीच्या शेजारी असलेल्या त्यांच्या शेतातील २ गुंठे शेताची खरेदी करून दिली. खरेदीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यवहार झाला नाही.तेव्हा भविष्यात अडचण नको म्हणून चंदापुरे यांनी चुक दुरुस्ती करून रजिस्टर बक्षीसपत्र करून ती शेत जमीन ग्रामपंचायतीला दिली.
एवढेच नव्हे तर त्यांच्या शेताला जो रस्ता आहे. तोच रस्ता विहिरीकडे जाण्यासाठी राहील, असे बक्षीस पत्रात लिहून दिले आहे. सर्व कागदपत्रांची तपासणी करून बक्षीस म्हणून मिळालेल्या त्या शेतात बोअर करण्याची परवानगी उपविभागीय अधिकारी यांनी दिली. यासोबतच मंडळ अधिकारी, महान यांचा अहवालही आहे.आपल्या स्वार्थासाठी वारंवार तक्रारी करून, सरपंच साल्पी (पाल्पी) यांनी गावातील नागरीकांना स्वच्छ व गोड पाण्यापासून वंचीत ठेवत आहे.
साल्पी वाल्पी गावात आदिवासी, दलित व इतर मागासवर्गीय लोकांची संख्या जास्त असून गावातील विहीरीचे पाणी खारट असून उन्हाळ्यात या विहिरी कोरड्या ठणठणीत होतात. रहिवाशांना पाण्याची नितांत गरज असल्याचे लक्षात घेऊन उदय नंदापुरे यांनी शेत जमीन बक्षीस दिली. पण सरपंचांनी ही योजना सुरुच होऊ नये म्हणून सुरुवातीपासुन तक्रारी देणे सुरू केले. परंतु अधिकारी आणि संबंधितांनी तक्रारी खोट्या असल्याने त्याची दाखल घेतली नाही आणि योजना सुरू केली. सरपंचांना बोलावले तर ते कधीही शासकीय कामात येत नाहीत.शेवटी सरपंचांनी उपोषणाला सुरुवात केली.
मात्र सरपंचांनी शासकीय काम अडविण्यासाठीच उपोषण सुरू केले असल्याचे उपसरपंच सांगत असून या कामामध्ये काहीही शंका असल्यास सखोल चौकशी करावी, मात्र सुरू कामे मार्गी लाऊन योजना पूर्ण करावी. जेणेकरून साल्पी वाल्पी येथील नागरीकांना स्वच्छ व गोड पाणी उपलब्ध होऊन न्याय मिळेल. अशा आशयाचे निवेदन अकोला जिल्हाधिकारी व अकोला जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी यांना उपसरपंच जया सतिश सयाम, सदस्य शकुंतला नंदापुरे, गणेश पांडूरंग क्षीरसागर, अक्षय वासुदेव ऊईके, बाबाराव घाडगे, पूजा नंदापुरे, शेवंताबाई भोंगरे यांनी दिले आहे.