अकोला दिव्य न्युज ब्युरो : आंतरराष्ट्रीय आजी आजोबा दिनानिमित्त रामदास पेठ येथील सन्मित्र पब्लिक स्कूलच्या ईशा लासूर्कर, सायली मुरूमकर, अभिलाषा तायडे व श्रुती धांडे या विद्यार्थिनींनी आजी आजोबा यांच्या स्वागतासाठी प्रवेशद्वारावर भव्य व आकर्षक रांगोळी काढली. तर दर्शना बेलसरे, प्रविण्या शेगोकार, भक्ती सुतार, ऋतुजा वानखडे, वेदश्री मानकर या विद्यार्थिनींनी मराठमोळ्या वेशामध्ये आजी आजोबांचे तिलकपुजन केले. तसेच बोबडे मॅडम, धनश्री देशमुख, श्रावणी देशमुख व रिद्धी पवार या विद्यार्थ्यांनी डिस्प्ले बोर्डाची सुरेख सजावट केली होती. यावेळी आजी आजोबांवर पुष्पवृष्टी करुन, आदरपूर्वक त्यांना स्थानापन्न करण्यात आले. यावेळी आजी आजोबांचे मन भारावून गेले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खानझोडे तर प्रमुख अतिथी म्हणून अर्जुन भारती, नलिनी भारती, सुषमा देशमुख उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली .शुभम नारे आणि त्यांचा संगीत समूहातील आदिती गावंडे, भक्ती सुतार, व कनवी पटेल यांनी स्वागत गीत सादर केले. संस्थेचे अध्यक्ष प्रदीप राजपूत व विद्यालयाच्या प्राचार्या मनिषा राजपूत यांनी आजी आजोबांना विशेष शुभेच्छा देऊन त्यांच्या दिर्घ आयु व निरामय आरोग्यासाठी प्रार्थना केली.
आपल्या भाषणातून समृद्धी डांगे हिने आजी आजोबांचे महत्त्व सांगितले.यश मोरे , आरूष ठोंबरे,गायत्री चारोडे, जीविका तायडे, मृणाली लोखंडे, कणवी पटेल, धनश्री नेमाडे, रोहिणी पवार, संकेत पवार, दर्शन थोरवे या विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्यगीत सादर केले. गीताचे बोल होते “प्यारे दादाजी है सबसे अनमोल l कितने मिठे इनके है अनुभव के बोल ” या नृत्य गीताचे संयोजन इशिका देशमुख व कृतिका गावंडे या विद्यार्थिनींनी केले. समृद्धी डांगे, दिव्या राऊत ऋतुजा वानखडे यांनी आजी आजोबांवर कविता सादर केल्या. तर आराध्या सागर, सुजल वासानी,फाल्गुनी मेडे यांनी आजोबांचे आपल्या जीवनातील महत्त्व विषद केले केले.
आजी आजोबांच्या मनोरंजनासाठी विविध खेळ व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये उखाणे स्पर्धा, स्मरणावर आधारित खेळाचे आयोजन करण्यात आले. उखाणे स्पर्धेमध्ये गीताताई गावंडे या आजींचा विजय झाला. स्मरणावर आधारित खेळामध्ये अर्जुन भारती या आजोबांनी क्रमांक पटकावला आहे. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात प्रमुख अतिथी अर्जुन भारती यांनी आजी आजोबांशी संवाद साधला आणि नातवंडांच्या जीवनात आपले स्थान काय याबद्दल चर्चा केली.
अध्यक्षीय भाषणात खानझोडे सरांनी आजच्या काळात आजोबांचे कुटुंबातील स्थान,त्यांची होत असलेली वाताहत ,वाढत चाललेले वृद्धाश्रम या बद्दल चर्चा केली आणि त्यांनी आजोबा आजींची आधुनिक काळातील अवस्था वर्णन करणाऱ्या दोन स्वरचित कविता सादर केल्या.अदिती गावंडे , आस्था अटकर यांच्या बहारदार संचालनाने कार्यक्रमात रंगत आणली.या कार्यक्रमाचे प्रभारी म्हणून दुर्गा राऊत मॅडम व वैशाली आगरकर मॅडम यांनी काम पाहिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गाढे, साहू, व्यवहारे मॅडम, सोनोने मॅडम, शिक्षकेत्तर कर्मचारी व इयत्ता ९वी व १०वी च्या विद्यार्थी स्वयंसेवकानी प्रयत्न केले.कार्यक्रम संपल्यानंतर आजोबा आजी डोळ्यात आनंदाश्रू घेऊन पुन्हा जड पावलांनी आपल्या घराकडे निघून गेले.