अकोला दिव्य न्यूज : डॉ.हेडगेवार रुग्णालय व अनुसंधान केंद्र हे धर्मदाय रुग्णालय असून या ठिकाणी सर्व रुग्णांना माफक दरात सुविधा उपलब्ध असून विविध समाजसेवी उपक्रम नित्य चालत असतात. त्याचाच एक भाग म्हणून डॉ. हेडगेवार रुग्णालय व अनुसंधान केंद्रच्यावतीने उद्या रविवार १६ फेब्रुवारी २५ रोजी सकाळी १० ते १ वाजेपर्यंत मोफत रोग निदान शिबिर आयोजित केले आहे.

अकोल्यातील राऊत वाडी येथील मुखर्जी बंगल्याजवळ असलेल्या डॉ. हेडगेवार रुग्णालय व अनुसंधान केंद्रात आयोजित शिबिरात अकोल्यातील मेडिसीन डॉ.तुषार चरखा, त्वचारोग तज्ञ डॉ.भरत पटोकार डॉ.चिन्मय पराडकर, डॉ.अनुप्रिता चौहान, स्त्रीरोग तज्ञ, डॉ.अमृता टापरे, बालरोग तज्ञ डॉ.अनुप चौधरी, डॉ.अभिजीत नालट, आर्थोपेडिक डॉ.प्रकाश मेटांगे, डॉ.दर्शन तातिया उपस्थित राहणार आहेत.
या शिबिरात हृदय व फुफ्फुसाच्या व्याधीचे निदान, विविध त्वचा रोगाचे निदान, स्त्री रोगाचे तसेच पीएपी स्मियरचे निदान, लहान मुलांच्या विविध आजारांचे निदान, सोबतच संधिवात, गुडघे दुखी, पाठदुखी, टाचदुखी, फ्रॅक्चर, मानदुखी, हाताला किंवा पायाला मुंग्या येणे, बधिर होणे, ठिसुळ हाड किंवा अन्य हाडांच्या रोगांचे निदान करण्यात येणार आहे. सोबतच प्रथम २५ येणाऱ्या रुग्णांची ईसीजी आणि शुगर टेस्ट, आर्थोची बीएमडी हाडांची ठिसुळता तपासणी मोफत करण्यात येईल. रुग्णांनी ९०२१४८२७५४ या क्रमांकावर नोंदणी करून शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन रुग्णालयाचे अध्यक्ष बाबासाहेब पाठक, प्रकल्प प्रमुख डॉ विनायक देशमुख यांनी केले आहे.