अकोला दिव्य न्यूज : Nanded Gurdwara Firing:- शहरातील गुरुद्वारा परिसरात आज सोमवार १० फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता गोळीबाराची घटना घडली. यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. घटने नंतर पोलिसांनी सर्व परिसरात नाकाबंदी केली होती.

गुरुद्वारा गेट क्रमांक 6 परिसरातील शहीदपुरा भागात तीन ते चार जणांनी दोन तरुणावर चार गोळ्या झाडल्या. त्यात गुरमीत सिंघ सेवादार , रविंद्र सिंघ राठोड हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबाराच्या या घटनेला पूर्वी याच भागात झालेल्या एका खुनाच्या घटनेची पार्श्वभूमी असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
( सविस्तर वृत्त लवकरच)