अकोला दिव्य न्यूज : two-babies-were-born-in-the-womb-of-this-poor-soul- बुलढाणा जिल्ह्यातील एका तीन दिवसांच्या बाळाच्या पोटातून पुरुष जातीची चक्क दोन अर्भके बाहेर काढण्यात आली. मंगळवारी सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील तज्ज्ञांच्या चमूने ही जोखमीची शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर बाळ सुखरूप आहे.
बुलढाणा जिल्हा स्त्री रुग्णालयात १ फेब्रुवारीला ३२ वर्षीय महिलेची प्रसूती झाली. बाळाच्या पोटातही गर्भअसल्याची बाब समोर आल्यानंतर शस्त्रक्रियेसाठी रविवारी अमरावती सुपरस्पेशालिटी रुग्णालयात दाखल केले. दीड तासाच्या या शस्त्रक्रियेनंतर बाळाच्या पोटातून दोन पुरुष जातीचे मृत, अर्धविकसित अर्भक काढण्यात आले.”नवजात बाळाच्या पोटात अर्भक आढळल्याची ही राज्यातील ही पहिली आणि जगातील ३४ वी घटना आहे. हा प्रकार पाच लाखांतून एक आहे. त्याला वैद्यकीय भाषेत ‘फिट्स इन फिटो’ म्हणतात.
‘ती’ दोन्ही अर्भके तीनशे ग्रॅमची
बाळाच्या पोटातून काढण्यात आलेले दोन्ही अर्भक हे पुरुष जातीचे आहेत. या अर्भकाचे डोके वगळता शरीराची वाढ काही प्रमाणात झाली होती. हे दोन्ही अर्भक बाळाच्या गर्भजलामध्ये होते. यामध्ये एका अर्भकाचे वजन २५० ग्रॅम, तर दुसरे ५० ग्रॅमचे असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. शस्त्रक्रियेत बाळाच्या पोटाला एकूण १२ टाके पडले आहेत.
गर्भात गर्भ वाढणे ही दुर्मिळ घटना आहे. यापूर्वी नागपूर मेडिकलमध्ये अशी शस्त्रक्रिया झाली होती. परंतु, या बाळाच्या पोटात दोन अर्भक होते. मी पहिल्यांदाच अशी शस्त्रक्रिया केली.असे बालरोगतज्ज्ञ डॉ. उषा गजभिये यांनी अकोला दिव्य सोबत बोलताना सांगितले.