अकोला दिव्य न्यूज : सिंधी समाजबांधवांचा शासकीय जमीन पट्ट्यांचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी सरकारने ठोस निर्णय घेतला आहे. लवकरच या बाबतीत नवीन शासन आदेश काढण्यात येणार आहे, अशी ग्वाही भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र व्यापारी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विरेंद्र कुकरेजा यांनी दिली.
अकोला आगमन प्रसंगी कुकरेजा यांचा स्थानीय सिंधी कॅम्प येथील बाबा हरदास राम भवनात सिंधी समाजातील भाजपा कार्यकर्त्याची सदिच्छा भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. सिंधी समाजाकडून कुकरेजा यांचे शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. यासोबतच नागपुरचे भाजपा पदाधिकारी राजेश बटवाणी, अनिल माखीजाणी यांचं देखील स्वागत केले.
समाजबांधवांसोबत कुकरेजा यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद मनवाणी यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकाश आनंदानी होते. संचालन विशाल मनवाणी तर आभारप्रदर्शन दीप मनवाणी यांनी केले. मंचावर हिरालाल कृपलानी, डॉ. मुस्कान पंजवाणी आणि माजी महापौर विजय अग्रवाल प्रामुख्याने उपस्थित होते.