Wednesday, January 22, 2025
HomeUncategorizedअकोला-खडकी ते मलकापूर फ्लॉयओव्हर मार्गावर जिवंत काडतूस ! हुंडीवालेंची तक्रार

अकोला-खडकी ते मलकापूर फ्लॉयओव्हर मार्गावर जिवंत काडतूस ! हुंडीवालेंची तक्रार

अकोला दिव्य न्यूज : अकोला शहरालगत असलेल्या खडकी ते मलकापूर फ्लॉयओव्हरकडे जाणाऱ्या रस्त्यावर बेवारस स्थितीत जिवंत काडतूस मिळाल्याने खळबळ उडाली असून या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी वजा तक्रार प्रविण हुंडीवाले यांनी खदान पोलिस ठाण्यात दिली आहे.

फाईल फोटो

स्व.किसनराव हुंडीवाले यांची 6 में 2019 रोजी न्यास नोंदणी कार्यालय येथे निघृण हत्या करण्यात आली. तेव्हा पासून प्रविण हुंडीवाले यांच्या सुरक्षिततेसाठी दोन अंगरक्षक तैनात करण्यात आले आहे. आता सध्या पोलिस शिपाई मयूर सिसोदे (ब.नं.420) व नायक दारासिंग सुखदाने (ब.नं.310) असे दोन कर्मचारी 24 तास तैनात आहेत. नेहमी 12, / 12 तास कर्तव्यावर असतात. दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी रात्री 8 वाजता सिसोदे हे कर्तव्यावर आले आणि 11 जानेवारी 2025 रोजी अंगरक्षक मयूर सिसोदे व महिंद्र शांताराम लंगोटे यांच्यासोबत दैनंदिन पहाटे फिरण्याकरिता जाऊन परत येत असताना मलकापूरहुन खडकीकडे येत असताना हॉटेल बैठक व हरिओम टेंट हाऊस समोरील रोडवर एक तांब्याचे जिवंत काडतूस रस्त्यावर बेवारस स्थितीत पडलेले दिसून आले.

अंगरक्षक मयूर सिसोदे व महिंद्र शांताराम लंगोटे यांच्यासोबतच हुंडीवाले यांनी सदर काडतुसची पाहणी केली असता, ते जिवंत असल्याचे दिसून आले. जातांना मात्र आम्हाला काही दिसून आले नाही परंतु परत येताना जिवंत काडतूस सापडणे ही अतिशय गंभीर बाब आहे. यामुळे आम्ही चिंताग्रस्त झालो आहोत. कारण नेहमी पहाटे फिरण्याचा हा दररोजचा मार्ग असून कोणीतरी माझ्यावर नियमित पाळत ठेवत आहे. घातपात करण्यासाठीच रेकी करीत असल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये माहीत देणे कर्तव्य असून अंगरक्षकांनी तक्रार करण्याबाबत समज दिली.असे तक्रारीत नमूद केले आहे.

Oplus_131072

दरम्यान अतिमहत्वाची नियोजित कामे पूर्ण करुन, संपूर्ण माहिती आणि जिवंत कडतुससह हुंडीवाले यांनी अंगरक्षक यांच्या समक्ष पोलिस स्टेशनला तक्रार दिली आहे. या पूर्वी सुद्धा जीव मारण्याच्या धमक्या व अ.क्र 225/2019 मधील आरोपीकडून माझ्‌या नित्यानियमाने बसत असलेल्या ठिकाणी रेकी व पाळत ठेवली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. ह्यातूनच सदरचे जिवंत काडतूस कोणीतरी अनोळखी इसमाने नेहमीच्या मार्गात टाकल्याचे दिसून येते. याची सूचना व माहिती देणे कर्तव्य आहे. याची दखल घेऊन संपूर्ण चौकशी करून सत्यस्थिती उघडकीस यावी अशी मागणी हुंडिवाले यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!