अकोला दिव्य न्यूज : शहराचा शैक्षणिक क्षेत्रातील जुन्या काळातील शिस्त, संयमी मात्र विद्यार्थी प्रिय शिक्षक व सिद्धहस्त मार्गदर्शक आणि न्यू इंग्लिश हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक कमलाकर कवीश्वर यांचं आज बुधवार १५ जानेवारीला वृध्दापकाळात निधन झाले. मृत्यू समयी त्यांचं वय ९० वर्षाचे होते. विधी क्षेत्रातील अँड. उल्हास कवीश्वर यांचे ते वडील होते. त्यांच्या मागे मुलगा, सुन, नातवंड, मुलगी, जावाई असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
न्यू इंग्लिश हायस्कूलच्या जडणघडणीत कवीश्वर सर यांचा मोठा वाटा असून त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच त्यांच्या तालमीत तयार झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. कविश्वर सरांच्या जाण्याने समाज एका निस्वार्थ मार्गदर्शकास मुकला आहे.अशा शब्दात अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
अंतिम यात्रा उद्या गुरुवार, दि. १६ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता, त्यांचे राहते घर, खेडकर नगर येथून निघेल. उमरी येथिल मोक्षधाम येथे त्यांचा अंतिम संस्कार करण्यात येईल.