अकोला दिव्य न्यूज : भगवंत प्राप्तीच्या मार्गात सर्वप्रथम भक्ताची आवड ही सर्वोपरी आहे. आवडीने भक्ताला भगवंताचा लळा लागून हा लळा प्रगाढ भक्तीत रूपांतरित होतो.भक्ताला वाटले पाहिजे की ही कथा हा सत्संग माझ्या देवाचा, माझ्या मालकाचा आहे. यामुळेच भगवंतप्रति आसक्ती होते, असा मौलिक हितोपदेश राधाकृष्ण महाराज यांनी केला. भागवत कथेत सोमवारी कथेचे पंचम पुष्प गुंफताना राधाकृष्ण महाराज यांनी भगवान कृष्णाची लीला कथन करीत कृष्ण भक्तीचे सांगोपांग विवेचन केले.
राधाकृष्ण महाराज पुढे म्हणाले, जे काही होत आहे. ते प्रभूच्या समतीनेच सुरू असल्याची भावना मनात सतत असू द्या, हे जीवन सर्वांच्या उपयोगी असू द्या, देह सर्वांच्या कामी लागू द्या.तरच भगवंताचा अनुग्रह आपल्यावर खऱ्या अर्थाने होऊ शकेल.
या सत्रात गुरुदेव यांनी नंद कथा प्रतिपादित करीत नंदोत्सव साजरा केला. यावेळी उपस्थित भक्तांनी “नंद के आनंद भयो,जय कनैय्या लाल की” चा जयघोष करीत जल्लोष केला.ते म्हणाले, वैकुंठात भगवंताच्या लीला होत नाहीत.त्या केवळ गोकुळातच होतात.अर्थात या भूतलावरच होतात.म्हणून ही भूमी अवतार कार्यसाठी अत्यंत आवश्यक व पवित्र असल्याचे सांगून पुतना वधाची कथा सांगितली.
मातांनी या संदर्भात आपल्या बाळाची आहारविषयक काळजी करीत गर्भवती मातांनी आहार, विचार व संगती योग्य केले पाहिजे. त्यात पतीने ने ही त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. महाआरती ने या सत्राची समाप्ती झाली. या सत्रात दैनिक यजमान राहुल राठी, ओमप्रकाश चांडक, नवनीत लखोटीया, विनोद लोहिया, डॉ अभय पाटील, कुंजबिहारी जाजू, खा.अनुप धोत्रे, सौ.सुहासिनी धोत्रे यांनी केले. तर रमाकांत खेतान, श्याम खंडेलवाल, शैलेंद्र कागलिवाल, कृष्णा शर्मा, प्रकाश डवले, डॉ.गजानन नारे, रवी खंडेलवाल, सुनील जांगीड, विजय राठी, पवन पाडीया, शिवप्रकाश रुहाटीया, बालमुकुंद भिरड, प्रकाश लोढीया, आनंद डागा, अँड. हेमंत मोहता, हरिष आलिमचंदानी आदींनी केले.
संचालन सीए मनोज चांडक यांनी केले.उद्या मंगळवार 14 जानेवारी रोजी कीर्तन महोत्सवात बार्शी येथील हभप अँड. जयवंत महाराज बोधले यांचे कीर्तन होणार आहे. बुधवार दिनांक 15 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता कथा कीर्तनाची भक्तिमय सांगता होणार असून सुरभी यज्ञ सकाळी 7 ते सकाळी 9 वाजेपर्यत होणार आहे पूर्णाहुती कथेचा भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन आदर्श गोसेवा व अनुसंधान प्रकल्प व सर्व सनातनी समाजातर्फे करण्यात आले आहे.