Monday, January 13, 2025
HomeUncategorizedExclusive ! युवापिढीला 'कथा श्रवण' अधिक गरजेचे : मानसिक बळ...

Exclusive ! युवापिढीला ‘कथा श्रवण’ अधिक गरजेचे : मानसिक बळ कणखर होते

गजानन सोमाणी यांनी घेतलेली विशेष मुलाखत : अकोला दिव्य : र्तमान परिस्थितीत युवापिढीत कणखर मानसिक बळ आणि निरंतर उत्साहाचा सातत्याने अभाव दिसून येत आहे. अलिकडच्या काळात यावर ‘मोटिव्हेशन’ आणि ‘मेडिटेशन’चा उपाय प्रचलित होत आहे. या माध्यमातून काही प्रमाणात, उत्साह संचारतो. पण नंतर पुन्हा निरुत्साह जाणवतो.मानसिक बळ कणखर करणं ही खरी गरज असल्याने प्रचलित मोटिव्हेशन पेक्षा प्राचीन साधना, उपासना आणि संकल्प हा रामबाण उपाय आहे. अस अमूल्य, हितकारक उपाय जोधपूर येथील कथावाचक, गोवत्सल राधाकृष्ण महाराज यांनी दिला आहे.

भगवंतांची उपासना, साधना हा मेडिटेशन आणि मोटिव्हेशनचाच एक प्राचीन भाग असून दैनंदिन अवघ्या काही मिनिटांसाठी केलेल्या उपासनेने दररोजच्या कार्यात निरंतर उत्साह निर्माण होऊन, युवकांचे मानसिक बळ कणखर होते. एक नवीन उर्जा निर्माण होते. तेव्हा युवापिढीने उपासना, साधना आणि संकल्पाची कास धरावी.असे आवाहन राधाकृष्ण महाराज यांनी केले आहे.

महाराजांची एक सहज भावमुद्रा

आदर्श गोसेवा आणि अनुसंधान प्रकल्पतर्फे गोपालनासह शेतकरी भवन उभारण्यासाठी अकोला येथे राधाकृष्ण महाराज यांच्या भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. यामाध्यमातून अकोला येथे अँड.आशिष बाहेती यांच्या निवासस्थानी महाराज मुक्कामी असताना, ‘अकोला दिव्य न्यूज’ कडून अध्यात्म आणि आजच्या पिढीसमोर असलेल्या आव्हानावर महाराजांची विशेष मुलाखत घेण्यात आली.

यावेळी भारतीय सनातन धर्मशास्त्र आणि विज्ञान यांच्यावर विचार मांडताना महाराजांनी कथा, प्रवचन आणि विज्ञान यांची सांगड कशी आहे, हे स्पष्ट करताना सांगितले की, हजारो वर्षांपूर्वी आमच्या सनातन धर्मशास्त्रात विज्ञानाचा मुळ ‘पाया’ घातला गेला असून, शोध, संशोधन, तंत्रज्ञान आणि विविध आविष्काराची भुमिका देखील याच शास्त्रात माडंली गेली आहे. आमच्या पुर्वजांचे ज्ञानेंद्रिये व बुध्दी एवढी तीव्र होती की, स्वप्नात बघितलेले दृश्ये त्यांनी दगडी व लाकडी शिल्पातून सजिव केली आहेत.आजच्या स्थापत्य अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे जनक देखील आमचे आद्य पुरुष आहेत. दुर्दैवाने आजच्या पिढीला हा इतिहास उलगडून दाखविला जात नाही आणि कथा व किर्तन हे केवळ वयस्करांसाठीच आहे, हा गोड मात्र चुकीचा समज केला गेला आहे.असं महाराजांनी वयाच्या १२ व्या वर्षांपासून स्वतः करीत असलेल्या भागवत कथेचे उदाहरण देऊन स्पष्ट केले.

वरीष्ठ आणि वयस्करांपेक्षा आज युवापिढीला ऊर्जावान आणि मानसिक बळ कणखर करण्यासाठी कथा, प्रवचन श्रवणाची जास्त गरज का आहे, याचा देखील उहापोह केला.

वयोमानानुसार शारीरिक क्षमतेसह व्याधी विचारांमुळे वरिष्ठांचे मानसिक बळ अत्यंत कमकुवत राहते. मात्र कथा श्रवणामुळे त्यांच्यात साहस वाढू लागतो. या उलट युवकांची शारीरिक क्षमता, साहस आणि मानसिक बळ मजबूत असते. मात्र मानसिक ताणतणावाने प्रबंधन करु शकत नसल्याने युवकांच्या मनाचा कणखरपणा कमी होवून ऊर्जा लयास जाऊ लागते. यासाठी, जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. हा दृष्टिकोन बदलण्यास युवापिढीत एक नवीन उर्जा निर्माण करण्यास सकारात्मक वातावरण फार गरजेचे आहे.असं सकारात्मक वातावरण कथास्थळीच राहते.

नामसंकीर्तन आणि भगवंत लिला गायिली जात असल्याने कथास्थळी सात्विक अणू-रेणू निर्माण होतात. सर्वत्र सकारात्मक उर्जा पसरल्याने जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून साहस वाढू लागतो. सहजपणे मानसिक बळ कणखर होते. हे सगळं विज्ञानाच्या कसोटीवर खरे ठरले आहे. तेव्हा काही वेळ मानसिक बळ देणारी औषधे, मेडिटेशन किंवा मोटिव्हेशन पेक्षा साधना उपासना आणि संकल्पनेची कास धरून कायम ऊर्जावान रहा, असं आवाहन राधाकृष्ण महाराजांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!