आज हभप अनिल महाराज पाटील यांचे कीर्तन
अकोला दिव्य न्यूज : प्रत्येक भक्तांचा कोणी ना कोणी इष्टदेव असतो.आपल्या इष्ट देवाला प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करतो.या भक्ती मार्गात त्याला अनेक देवतांची स्थळे दृष्टिगोचर होतात. तो तेथेही भक्ती करतो. ही बाब भक्तीसाठी आवश्यक असली तरी आपली कामना,आपल्या इष्ट देवते शिवाय अन्य देवतांपाशी आपली प्रदर्शित करू नये यामुळे आपले तप हे नष्ट होते.म्हणून कामना केवळ आपल्या इष्ट देवाकडे करण्याचा हितोपदेश पु राधाकृष्ण महाराज यांनी केला.
मुंगीलाल बाजोरिया विद्यालय प्रांगणात सुरू असलेल्या भागवत कथेत रविवारी कथेचे चतुर्थ पुष्प संपन्न झाले. यात कृष्ण भक्ती व प्रल्हादाची भक्तिमय कथा प्रतिपादित केली.ते म्हणाले, भगवंत प्राप्तीसाठी भक्तांची सातत्याने भक्तिमार्गात भटकंती सुरू असते.ती भटकंती इष्टदेव च्या माध्यमातून पूर्ण होऊ शकते.मात्र भक्ताने इष्ट देव शिवाय अन्य ठिकाणी आपली कामना न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.पु राधाकृष्ण महाराज यांनी या सत्रात भगवान बुद्धांचा कथेच्या अनुषंगाने दृष्टांत दिला.तसेच भक्त प्रहलाद व नरसिंह अवतार,समुद्र मंथन, प्रभूंचे मोहिनी रूप,वामन व कृष्ण अवतार आदींची संगीतमय कथा सांगितली.यावेळी कृष्ण जन्माचा जल्लोष करण्यात आला.
कथा परिसरात संगीतमय भजनांनी जल्लोष निर्माण झाला. महिला पुरुष भक्तांनी फेर धरून नृत्य सादर केले. या सत्रात हभप संजय महाराज पाचपोर, दिलीप बाबा यांनी आपली उपस्थिती दर्शविली. महाआरतीने या सत्राची समाप्ती झाली. या सत्रात गुरुदेव यांचे स्वागत दैनिक यजमान गजानन शेळके, जितेंद्र तिवारी, जयप्रकाश राठी, प्रवीण टावरी, विश्वास गावंडे, शुभम राठी, जुगल खंडेलवाल, अभिषेक भट्टड, पन्नालाल भुतडा, रमण गांधी, अश्विन झोपे, डॉ पार्थसारथी शुक्ल, डॉ श्रीकांत मालपाणी, डॉ संजय केडीया, प्रशांत देशमुख, सुशील खोवाल, संजय अग्रवाल (पाईपवाले), सुनील इन्नानी आदींनी केले.
आज सोमवार 13 जानेवारी रोजी कीर्तन महोत्सवात बार्शी येथील हभप अनिल महाराज पाटील यांचे कीर्तन होणार आहे. दि. 15 जानेवारीपर्यंत नित्य दुपारी 2 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आयोजित राधाकृष्ण महाराज यांची भागवत कथा व रात्री 7-30 ते रात्री 10 पर्यंतच्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवाचा भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन आदर्श गोसेवा व अनुसंधान प्रकल्पतर्फे करण्यात आले आहे.
कीर्तन, प्रवचनात येणाऱ्या भाविकांसाठी तुलादानाची व्यवस्था करण्यात आली असून गो-प्रदक्षिणेसाठी येथे लघु गोमाता आहे. या तुलादान सेवाकार्यात हरीश मानधने, शिवकुमार भाला, राधेश्याम भन्साली, विजय राठी जावरावाले, अनुप राठी, रमेश राठी, राजीव मुंदडा, भगवानदास तोष्णीवाल, सुरेश मुंदडा सेवा देत आहेत. भाविकांच कल्याण आणि गाईंच्या संगोपनासाठी सुरभी कामधेनु यज्ञ अखंडपणे सुरू असून नरेंद्र भाला, राधेश्याम भाटीवाल, दीपक खंडेलवाल,रवी चांडक, गोपाल तायडे, राजेश जैन, सुरेश खंडेलवाल, मयूर सायानी, एल.आर.शर्मा आपली सेवा देत आहेत.
कथा परिसरात आदर्श गोसेवेचा स्टॉल असून त्यात राम पटले, गणेश गाडगे, श्रीप्रसाद पाठक, सुधाकर दुतोंडे सेवा देत आहे. गोविंदा परिवारच्या मोफत चहा सेवा कार्यात गोविंद बजाज, विजय हेडा, भगवनदास राठी, धनेश भाला, जुगल राठी, संतोष राठी, रवी घाटे, प्रदीप राठी सेवा देत आहेत.या सोबत राज राजेश्वर प्रेरणा मंडळच्यावतीने मोफत फराळ वितरण सुरू आहे.