अकोला दिव्य न्यूज :akola divya / fraud can happen in the name of kumbh mela police appeal to beware of cyber criminals : देशभरात इंटरनेटच्या माध्यमातून डिजिटल सुविधेचा गैरवापर करून सायबर गुन्हेगार लोकांची आर्थिक फसवणूक करत असल्याचे प्रकार दररोज घडत आहेत. अशातच लोकांच्या धार्मिक भावनांना हात घालून कुंभमेळ्याच्या नावाचा गैरवापर करण्यासाठी काही सायबर चोरटे देशभरात सक्रिय झाले असल्याचे समोर येत आहे. तेव्हा फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी केले आहे.
कुंभमेळा या धार्मिक कार्यक्रमांच्या निमित्ताने सायबर गुन्हेगार इंटरनेटच्या माध्यमातून डिजिटल सुविधेचा गैरवापर करून भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतात. बनावट वेबसाइट, लिंक किंवा इतर माध्यमांचा वापर करून नागरिकांची फसवणूक करतात.
ही बाब भारत सरकार गृहमंत्रालयाच्या निदर्शनास आली आहे. बनावट वेबसाइटद्वारे कुंभमेळ्यासाठी देणगी गोळा करण्याच्या नावाखाली बनावट वेबसाइटचा वापर करून आर्थिक फसवणूक केली जात आहे. तसेच ऑनलाइन बुकिंगद्वारे लोकांची फसवणूक करण्यासाठी, भाविकांसाठी निवास व्यवस्था, दर्शन पास इत्यादी बुकिंगच्या नावाने बनावट वेबसाइटद्वारे पैसे उकळले जात आहेत. भाविकांची अशा प्रकारे फसवणूक केल्याचा काही घटना उघडकीस आलीय, तेव्हा कुंभमेळ्याच्या नावाने आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करु नये. कुंभ मेळाव्याच्या कोणत्याही जाहीरातीमधिल लिंकवर देखील क्लिक करु नये. यामाध्यमाने आर्थिक लूबाडणूक होण्याची शक्यता आहे. कुंभमेळासंबंधी बनावट लिंक, बेवसाइट्स किंवा मेसेजवर क्लिक करू नका. फसवणुकीचा संशय आल्यास सायबर हेल्पलाइन cybercrime.gov.in किंवा १९३० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा.
सत्यता तपासा : कुंभमेळासंबंधी अधिक माहितीसाठी https://kumbh.gov.in अधिकृत वेबसाइटवर संपर्क साधावा.
आपली गोपनीय माहिती शेअर करू नका : बँक खाते क्रमांक, पासवर्ड वा इतर कोणतीही संवेदनशील माहिती कोणालाही देऊ नका. akola/ fraud can happen in the name of kumbh mela police appeal to beware of cyber criminals