Tuesday, January 7, 2025
HomeUncategorizedलाडक्या बहिणींनो सावधान! पडताळणी झाली सुरू : 7 हजार 500...

लाडक्या बहिणींनो सावधान! पडताळणी झाली सुरू : 7 हजार 500 रुपये केले वसुल

अकोला दिव्य न्यूज : राज्यातील ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजना कार्यान्वित करताना निश्चित केलेल्या विविध निकषाची पडताळणी करणे क्रमप्राप्त होते. मात्र निवडणूक तोंडावर असल्याने सरसकट सर्वच अर्ज मान्य करुन अर्जदार महिलांच्या खात्यात साडेसात हजार रुपये जमा देखील केले. लाडक्या बहिणीच्या भरघोस पाठिंब्याने महायुती सत्तेवर येताच, निकष डावलून या योजनेचा लाभ घेतलेल्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. एका महिला लाभार्थीला मिळालेले साडे सात हजार रुपये चक्क सरकारने वसुल केले आहे. आता या कारवाईत लाखो लाभार्थी अपात्र ठरविण्यात येईल आणि पैसा वसूल केला जाईल. तेव्हा लाडक्या बहिणी काय करणार, साडे सात हजार रुपये देणार की काय, हे बघणं मजेशीर होईल.

महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर अर्जाची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेचा आढावा घेतल्यावर अर्जाची पडताळणी करण्याची घोषणा महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी केली. यानंतर सरकारी धोरणानुसार प्रत्येक जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेतील अर्जदारांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. निकषात न बसणाऱ्यांना अपात्र ठरविले जाणार आहे. या योजनेचा गैरफायदा घेतला असल्याच्या तक्रारी देखील अनेक जिल्ह्यांतून आलेल्या आहेत. तक्रारीच्या निमित्ताने केसरी व पिवळे शिधापत्रिकाधारक वगळता सर्वच अर्जाची छाननी होणार आहे.

एका महिलेने सरकारी योजनेचा दुबार लाभ घेतल्याचे चौकशीत आढळल्याने या महिलेकडून पैसे परत घेण्यात आले. धुळे जिल्ह्यातील नकाणे गावातील खैरनार नामक महिलेने सरकारी योजनेचा दुबार लाभ घेतल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. अन्य एका योजनेतही आर्थिक लाभ घेतला होता. लाडकी बहीण योजनेचे पैसे परत करण्याचे तिला सांगण्यात आले. त्यानुसार या महिलेला मिळालेले पैसे परत सरकारकडे जमा झाले आहेत.

संग्रहित छायाचित्र
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!