अकोला दिव्य न्यूज : विदर्भातील उद्योग क्षेत्राच्या प्रगतीत हातभार लावण्यासोबतच पश्चिम विदर्भातील तरुणांना रोजगाराची संधी आणि ग्राहकांना दर्जेदार उत्पादनाने उपलब्ध करून देण्यात यशस्वी ठरलेल्या नामांकीत रूहाटिया ग्रुपने निर्यात क्षेत्रात देखील मोठी मजल मारता महाराष्ट्र राज्याच्या औद्योगिक क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवल्या गेला आहे.
देशातील कॉटन व्यवसायात आपलं एक वेगळेच स्थान निर्माण करणारे रुहाटिया ग्रुपने कालुराम फुड प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून विविध खाद्यान्न आणि गृहोपयोगी वस्तूंचे उत्पादन सुरू केले. अवघ्या काही वर्षांत आपल्या नैसर्गिक, शुध्द आणि आरोग्यदायी अशा दर्जेदार उत्पादनाने, विशेषतः ‘विठ्ठल’ या नावाने बाजारात दाखल सर्वच उत्पादनांनी राज्यातील ग्राहकांचा विश्वास प्राप्त केले आहे. आता हीच उत्पादने अंतरराष्ट्रीय माणकात शंभर टक्के यशस्वी असल्याने रुहाटिया ग्रुपने निर्यात क्षेत्रात पाऊल उचलले.
अकोला शहरातील रूहाटिया ग्रुपची सर्व उत्पादने अल्पावधीतच विदेशातील ग्राहकांच्या कसोटीवर खरे उतरले. देशाच्या निर्यात व्यापारात खारीचा वाटा उचलला. या विशेष उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन नागपूर येथे नाग-विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स आणि ईसीजीसी या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने २० डिसेंबर रोजी पार पडलेल्या एक्सपोर्ट-इंपोर्ट समिटमध्ये रूहाटिया ग्रुपला पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
नागपूरयेथील टुली इंपीरीयत हॉटेलमध्ये पार पडलेल्या शानदार एक्सपोर्ट-इंपोर्ट समिटमध्ये महाराष्ट्राचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते रूहाटिया ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर शिवप्रकाश रुहाटिया आणि संचालक, सिध्दार्थ रुहाटिया व साकेत रूहाटिया यांना पुरस्कृत करण्यात आले.
डीओसी ऑइल व ऑइल एक्सपोर्टमधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल रूहाटिया ग्रुपला हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी देशभरातील उद्योग क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती लाभली होती.